श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 28 आँक्टोबर 2026.
नुकत्याच झालेल्या नागपुर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजप महायुतीला मोठा धक्का देत कांग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी जोरदार मुसंडी मारली आहे.
कांग्रेसचे अभिजीत वंजारी यांना जवळपास 3 हजारांची आघाडी मिळाल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. मात्र अजुन त्यांच्या विजयाची घोषणा व्हायची आहे.


त्यामुळे कांग्रेसच्या गोटात मोठी आनंदाची लहर निर्माण झाली आहे. भाजपची केंद्र व राज्यात सरकार असतांना चुरशीच्या लढतीत कांग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना अक्षरशः घाम फोडला आहे.अभिजीत वंजारींच्या विजयाकडे घोडदौडीमुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हेविवेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कांग्रेस च्या एकजुटीने पराभवाच्या छायेत सोडले आहे.पण त्याचबरोबर अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांचा मोठा वाटा आहे कांग्रेसचे अभिजीत वंजारी यांना मोठे मताधिक्य देण्यासाठी. हे ही तितकेच खरे आहे.

कांग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्या आघाडीची माहिती मिळताच कांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत विजयाचे विक्ट्री साईन उमेदवार अभिजीत वंजारी, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी दाखवले आहे.











