श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online .
मुंबई :25 नोव्हेंबर 2026
नागपूर जिल्ह्यातील मौदा नगर पंचायतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी मौजा मौदा येथील 0.38 हेक्टर नझुल शासकीय जमीन विनामूल्य उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला..
मौजा मौदा, (ता. मौदा, जि. नागपूर) येथील प.ह.नं. 73, सर्व्हे क्रमांक 450 मधील 0.38 हेक्टर नझुल शासकीय जमीन नगर विकास विभागामार्फत मौदा नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी विनामूल्य प्रदान करण्यात येणार आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,”स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करण्यासाठी त्यांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मौदा नगर पंचायतीच्या प्रशासकीय इमारतीसाठी शासकीय जमीन विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा त्या दिशेने महत्त्वाचा टप्पा आहे. या इमारतीमुळे नगर पंचायतीचे प्रशासकीय कामकाज अधिक सुव्यवस्थित होईल आणि नागरिकांना विविध सेवा-सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे सुलभ होईल. नागपूर जिल्ह्यासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी आवश्यक सहकार्य करण्यास शासन कटिबद्ध आहे.”










