श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
रनाळा -कामठी/नागपुर : 12 नोव्हेंबर 2026. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या दिवाळी शिध्याचे वाटप ग्रामपंचायत रनाळा येथे गावातील नागरिकांना करण्यात आले.
आमदार कृपाल तुमाने यांच्या माध्यमातून हा शिधा ग्रामपंचायत रनाळा येथे उपलब्ध करून देण्यात आला. यावेळी या प्रसंगी शुभम नवले, सचिव महाराष्ट्र युवासेना व ग्रामपंचायत रनाळाचे सरपंच पंकज साबळे, राजकुमार घुले यांच्या उपस्थितीत दिव्यांग, एकल, विधवा महिला व गरजु नागरिकांना दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात आले.
गावातील नागरिकांना दिवाळीच्या सणानिमित्त मदतीचा लाभ मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.











