अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांच्यासोबत ची दुसऱ्या क्रमांकाची मतमोजणी बाकी!
श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 28 आँक्टोबर 2026.
नागपुर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या मतमोजणी ला जवळपास 32 तास उलटले आहेत. सध्या एलिमेशन राऊंडमध्ये जवळपास 30 च्या वर उमेदवार बाद झाले आहेत. राजकीय गोटात चर्चा होती की इतर बाद उमेदवार यांना मिळालेल्या मतांमध्ये दुसऱ्या पसंतीची मते ही भाजपला मिळणे कठीण आहे. परंतु भाजप चे सुधाकर कोहळे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते ही मिळत आहेत. आणि त्यांची आघाडी ही कासवाच्या गतीने वाढत आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेले नितेश कराळे मास्तर यांच्या सोबत दुसऱ्या क्रमांकाची मते अभिजीत वंजारी यांनाच भेटतील असा विश्वास काँग्रेस नेत्यांना आहे. परंतु आतापर्यंत झालेल्या मतमोजणी मध्ये विपरित अनपेक्षित निकाल पुढे येत आहे. भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांची 5123 मतांची आघाडी गाठणे किंवा तिला कमी करणे हे कांग्रेसचे अभिजीत वंजारी यांना सध्या तरी कठीण होत चालले आहे. त्यामुळे त्यांना विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.म्हणजे एकप्रकारे अभिजीत वंजारी हे नितेश कराळे मास्तर यांच्यवरर अवलंबून आहेत. नितेश कराळे यांच्या सोबतची दुसऱ्या क्रमकाची भा मतमोजणी अजुन शिल्लक आहे. परंतु भाजप महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे हे असाच ट्रेंड सुरु राहिला तर अंदाजे 5 हजार मतांनी नागपुर पदवीधर मतदारसंघातुन निवडुन येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीसह 28 उमेदवार बाद करण्यात आल्यानंतर स्थिति अशी आहे.
1) सुधाकर कोहळे (भाजप महायुती)- 61,029
2) अभिजीत वंजारी(महाविकास आघाडी) – 56,785
त्यामुळे सुधाकर कोहळे 4,244 मतांनी पुढे…
विधानपरिषद निवडणुकीत (किंवा कोणत्याही एकल संक्रमणीय मतदानाद्वारे होणाऱ्या निवडणुकीत) पहिल्या फेरीत जर कोणत्याही उमेदवाराला निर्धारित मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही, तर ‘एलिमिनेशन’ (बाद फेरी) आणि मतांचे हस्तांतरण (Vote Transfer) सुरू होते. या प्रक्रियेमुळे उमेदवाराचा पराभव किंवा निवडणूक रद्द होत नाही, तर खालील टप्प्यांद्वारे निकाल लावला जातो.
आताच माहिती हाती आल्यानुसार एकुण 30 उमेदवार बाद झाले असुन भाजप महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी 5123 मतांची आघाडी घेतली आहे. अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांच्या सोबत दुसऱ्या क्रमांकाची मतमोजणी अजुन व्हायची आहे. हे विशेष!
भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांच्या आवाहनानंतर ही त्यांना 300 च्या वर पडली मते ! भाजप चे अपक्ष बंडखोर उमेदवार अनिल सोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहानुसार भाजप चे उमेदवार सुधाकर कोहळे यांना समर्थन दिले परंतु तरीही त्यांना पहिल्या पसंतीची 267 आणि पोस्टल बॅलेट मध्ये 7 अशी एकूण 274 मत मिळाली आहेत. अनिल सोले यांना मिळालेल्या 274 मतांमधील दुसऱ्या पसंतीची मतंही मोजण्यात आली. अनिल सोले यांच्या मतांमध्ये अभिजीत वंजारी यांना दुसऱ्या पसंतीचे 41 मतं मिळाली. अनिल सोले यांच्या मतांमध्ये सुधाकर कोहळे यांना दुसऱ्या पसंतीची 88 मतं मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना सोले यांच्या मतांमधून कराळे यांना दुसऱ्या पसंतीची 10 मते मिळाली आहेत. त्यामुळे अनिल सोले यांच्या मतांमधून भाजप उमेदवार सुधाकर कोहळेंना दुसऱ्या पसंतीची सर्वाधिक पसंती मिळाली असली, तरी अभिजीत वंजारी यांनाही अनिल सोले यांच्या मतदारांनी दुसरी पसंती दिली आहे, ही बाब लक्षणीय आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाचा निकाल पूर्णपणे स्पष्ट व्हायला आता थोडाच अवधी शिल्लक राहिला आहे. भाजपच्या सुधाकर कोहळे यांच्याकडे सध्या तब्बल 5123 मतांची आघाडी आहे. त्यांनी ही आघाडी टिकवल्यास त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.











