शिवसेना पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे सामुहिक विवाह,25 हजार शिलाई मशीन, सायकली वाटप!
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
जालना : 10 नोव्हेंबर 2026.
शेतकऱ्यांच्या आयुष्यात दुष्काळाच्या संकटाचे सावट असताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना येथे शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी केली.


दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळीही आनंदात जावी, या भावनेतून शिवसेनेच्या वतीने शेतकरी कुटुंबांना दिवाळी शिध्याचेही वाटप करण्यात आले. यावेळी जालना जिल्ह्यातील मौजपुरी येथील शेतकरी अंबादास तांगडे यांच्या घरी भेट देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत जमिनीवर बसून भोजन केले. त्यांच्या मातोश्री आणि मुलांची आस्थेने विचारपूस केली. केवळ मदतीचा हातच नाही, तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्यांच्या आनंदात सहभागी झाले.


यावेळी तांगडे कुटुंबातील मुलीच्या उच्च शिक्षणाची आणि विवाहाची संपूर्ण जबाबदारी शिवसेनेच्या वतीने स्वीकारण्यात आली. तसेच दुष्काळग्रस्त भागातील ज्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे विवाह ठरले आहेत, त्यांचे विवाह शिवसेनेच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्यातून करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 12 कलमी सवलती जाहीर केल्या असून, अग्रीम मदत म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार रुपये जमा केले आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून दिवाळी शिध्याचे वाटप, शेतकरी महिलांना 25 हजार शिलाई मशीन आणि मुलींना 25 हजार सायकलींचे वितरण करण्यात आले आहे. पुढील पाऊस होईपर्यंत पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि अन्नधान्याची व्यवस्था करण्यासाठी सरकारसोबत शिवसेनाही पूर्ण ताकदीने कार्यरत राहणार आहे. यावेळी शेतकऱ्यांना धीर देताना एकनाथजी शिंदे साहेब यांनी, “संकट मोठे आहे, पण धीर सोडू नका. टोकाचा निर्णय घेऊ नका. शिवसेना आणि सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” अशी ग्वाहीही दिली.
याप्रसंगी शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Shivsenaofc #EknathShinde #Drought #Farmers #Jalna #advashishjaiswal
Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे Shivsena – शिवसेना











