श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 28 आँक्टोबर 2026.
आज बुधवारी सकाळी समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार नागपूर पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीच्या दोन्ही फेरीनंतर 1 लाख 50 हजार 874 मतं ही वैध ठरल्यामुळे नियमाप्रमाणे 75 हजार 438 मताचा विजयाचा कोटा ठरला असून दोन्ही उमेदवार तेवढे मतं घेऊ शकलेले नाहीत. त्यामुळे आता बाद फेरी सुरू होऊन दुसऱ्या पसंती क्रमाचे मत मोजण्यास सुरुवात झाली आहे
पहिल्या फेरीत काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या फेरीत चित्र पालटले आणि ही फेरी संपेपर्यंत भाजपचे सुधाकर कोहळे 4,291 मतांनी आघाडीवर आले. मात्र, सुधाकर कोहळे यांच्यासह कुठल्याच उमेदवाराचा विजयाचा कोटा पूर्ण झाला नसल्याने आता दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु झाली आहे. पहिल्या दोन फेऱ्यांच्या मतमोजणीत अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांनी कमाल केल्याचे दिसून आले. नितेश कराळे पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये 24,249 मतं मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आता त्यांच्या मतांपैकी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांना दुसऱ्या पसंतीची किती मतं मिळतात हाच मुद्दा नागपूरच्या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
आता एलिमेशन ची प्रक्रिया सुरू झाली असुन आतापर्यंत 4 उमेदवार बाद झालेत. विजयासाठी 75438 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. हा कोटा गाठणे आव्हानत्मक राहणार आहे प्रत्येक उमेदवाराला.
अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर ठरणार गेमचेंजर!
या सर्वांमध्ये अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांनी चांगलीच मुसंडी मारली होती. नितेश कराळे हे या निवडणुकीत गेमचेंजर ही ठरु शकतात. नितेश कराळे मास्तर यांना पहिल्या पसंतीचे 24 हजार मते मिळाली आहेत. त्यांचे पसंतीक्मकांचे वोट ट्रांसफर नेमके कोणाच्या पारड्यात जातात हे सुद्धा बघणे महत्वाचे ठरणार आहे. त्यानंतर एलिमेशन चे बरेच राऊंड आपणास बघायला मिळतील नागपुर पदवीधर निवडणूकीत. त्यामुळे एकही उमेदवार विजयी मतांचा कोटा पूर्ण करण्यात अपयशी सुद्धा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नितेश कराळे यांचे वोट ट्रांसफर ज्या उमेदवाराला होईल तोच उमेदवार विजयी होईल असेही म्हटले जाते. आता 75 हजार मतांचा विजयी कोटा पूर्ण करण्यासाठी कांग्रेस भाजप उमेदवार यांची दमछाक होतांना दिसत आहे. दुसरीकडे अवैध बाद मतांची संख्या ही 15 हजारापेक्षा जास्त झाल्याने भाजप कांग्रेस उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. या बाद झालेल्या मतांची फेरमोजणीची मागणी भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांनी केलेली आहे.
नागपुर पदवीधर मतदारसंघातील या निवडणुकीतील मतमोजणी चुरशीची झाल्याने पहिल्यांदाच एवढा हायहोल्टेज ड्रामा नागपुरात बघायला मिळाला.
नागपुर पदवीधर निवडणुकीतील विजयाचे गणित असे असु शकते!
कोटा पुर्ण करायला सुधाकर कोहळे यांना 14514 मते पाहिजे आणि अभिजीत वंजारी यांना 18808 मते आणखीन पाहिजे.. कराळे मास्तर ची मते 24249 आहे.. ही सर्व बाद होतील.. आणि त्यावर असलेल्या दुसऱ्या पसंतीक्रमाच्या उमेदवाराला ट्रान्सफर होतील.. या व्यतिरिक्त अन्य 34 उमेदवारांची बाद होणारी 7975 मते आहेत.. म्हणजे 24249 +7975 =32324 मते बाद होणार आहेत.. या सर्व मतपत्रीकेवर ज्या उमेदवाराला दुसऱ्या पसंतीची सर्वाधिक मते मिळून सर्वप्रथम कोटा पुर्ण करणारा उमेदवार विजयी होईल










