श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
खापरखेडा/नागपुर :27 नोव्हेंबर 2026.
कोराडी व खापरखेडा परिसरातील विमाधारक व त्यांच्या कुटुंबियांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘सेवा दवाखान्याचे’ उद्घाटन शुक्रवारी 27 नोव्हेंबर 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. माननीय आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते फित कापून या दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना आ.डॉ.आशिष देशमुख यांनी परिसरातील विमाधारक व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा बळकट होण्याची गरज व्यक्त केली. कोराडी व खापरखेडा भागातील विमाधारक रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना आपल्याच परिसरात दर्जेदार आणि वेळेत उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘सेवा दवाखाना’ या माध्यमातून या परिसरातील विमाधारक व त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, दवाखान्याच्या पुढील वाटचालीस त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


या कार्यक्रमास वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. चारुदत्त साळवे, मुख्य प्रशासन अधिकारी विजय गोडे, कार्यालयीन अधीक्षक चारडे, वरिष्ठ लिपिक मुकेश सराफ, इतर कर्मचारी तसेच परिसरातील विमाधारक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळाजी शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राहुल बागडे यांनी मानले.










