श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
खापरखेडा /नागपुर :27 नोव्हेंबर 2026.
भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) नागपूर जिल्हा उपाध्यक्ष जय विजय तिवारी यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ (Special Executive Officer) या प्रतिष्ठित पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राजकीय व सामाजिक स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
आपल्या या नियुक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना जय विजय तिवारी यांनी पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आणि मार्गदर्शकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. ते म्हणाले की, “महाराष्ट्र शासनाच्या ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ पदी माझी नियुक्ती झाल्याबद्दल मी सर्व वरिष्ठ नेतृत्वाचा हृदयपूर्वक ऋणी आहे. या जबाबदारीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची सेवा करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.”
या नियुक्तीबद्दल त्यांनी राज्याचे राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिष देशमुख, विधान परिषद सदस्य डॉ.राजीव पोद्दार, भाजप नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर चौधरी, बबलू भैया ठाकूर, भाजयुमो नागपूर जिल्हाध्यक्ष अनिकेत अतुरकर, जिल्हा महामंत्री शितल, भाजप खापरखेडा शहर अध्यक्ष श्रीराम डाकरे तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.









