श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी/नागपुर : 13 आँक्टोबर 2026.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन पर्वावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत अनुयायी आणि थोर समाजसुधारक कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बुधवार, 14 ऑक्टोबर 2026 रोजी कामठी येथील ड्रॅगन पॅलेस कॅम्पसमध्ये विविध लोकोपयोगी व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी राज्यमंत्री तथा ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख ॲड. सुलेखाताई कुंभारे भूषविणार आहेत.
दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा:
सकाळी 10 वाजता: विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विशेष बुद्धवंदना आयोजित करण्यात आली आहे.
सकाळी 10:30 वाजता: ड्रॅगन पॅलेस कॅम्पस, कर्मवीर दादासाहेब कुंभारे परिसरातील त्यांच्या पूर्णाकृती शिल्पाला माल्यार्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात येईल.
सकाळी 11 वाजता (आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर): एम.टी.डी.सी. हॉल येथे भव्य आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते पार पडेल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीरंग वराडपांडे आणि डॉ. विलास सपकाळ उपस्थित राहतील. या शिबिरात स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर, नागपूर; डॉ. महात्मे आय हॉस्पिटल, नागपूर; आशा हॉस्पिटल, कामठी आणि लायन्स क्लब, कामठी यांचा सक्रिय सहभाग लाभणार आहे.
दुपारी 1 वाजता (युवा सक्षमीकरण व रोजगार मार्गदर्शन शिबीर): दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था हॉलमध्ये तरुणांसाठी ‘Youth Empowerment And Employment Guidance Workshop’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांच्या हस्ते होईल. यामध्ये समाजकार्य महाविद्यालय (कामठी), एमएसएमई नागपूर, रोजगार व कौशल्य विभाग, जिल्हा उद्योग केंद्र नागपूर तसेच खादी ग्रामउद्योग कमिशन नागपूर या संस्थांच्या माध्यमातून तरुणांना मार्गदर्शन मिळणार आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम ओगावा सोसायटी, विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था, ड्रॅगन इंटरनेशनल स्कूल आणि ओगावा इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी, रुग्णांनी तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या आरोग्य शिबीर आणि रोजगार मार्गदर्शन कार्यशाळेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.










