श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी/नागपुर : 15 आँक्टोबर 2026.
ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन पर्वावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कट्टर अनुयायी आणि दलित शोषित व बिडी कामगारांचे नेते कर्मवीर ॲड. दादासाहेब कुंभारे यांच्या स्मृतिदिनानिमित्त काल 14 ऑक्टोबर रोजी कामठी येथील ड्रॅगन पॅलेस कॅम्पसमध्ये विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या निमित्ताने आयोजित आरोग्य शिबिरात 1215 तर नेत्र तपासणी शिबिरात तब्बल 1720 अशा एकूण 2135 गरजू रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यांना औषधोपचार व योग्य सल्ला देण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी स्वखर्चातुन अंदाजे 500 च्या आसपास धम्मसेवक,पत्रकार व गरजु नागरिकांना मोफत चश्मेवाटप केले. तर इतरांना अल्प दरात डॉ. महात्मे आय हाँस्पिटल तर्फे अल्प दरात चश्मे उपलब्ध करून दिले.
ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील दिवंगत अँड. दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री तथा ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख ॲड. सुलेखाताई कुंभारे ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या. सकाळी 10 वाजता ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विशेष बुद्धवंदना घेण्यात आली.
भव्य शिबिराचे उद्घाटन
सकाळी 11 वाजता एम.टी.डी.सी. हॉलमध्ये भव्य शिबिराचे उद्घाटन माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. श्रीरंग वराडपांडे आणि डॉ. विलास सकाळ उपस्थित होते.

तज्ञ डॉक्टरांच्या चमूने दिली सेवा
या शिबिरात स्व. भानूताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर, नागपूर, डॉ. महात्मे आय हॉस्पिटल, नागपूर; आशा हॉस्पिटल, कामठी आणि लायन्स क्लब, कामठी यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने नागरिकांची तपासणी करून औषधोपचार व योग्य मार्गदर्शन केले.

संयुक्त आयोजन
या संपूर्ण भव्य उपक्रमाचे यशस्वी आयोजन ओगावा सोसायटी, विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंन्टर, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, दादासाहेब कुंभारे बहुउकोशीय प्रशिक्षण संस्था, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल आणि ओगाबा इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.










