श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 28 आँक्टोबर 2026.
नागपुर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या मतमोजणी मध्ये चुरशीची लढत बघायला मिळत आहे. पहिल्या फेरीमध्ये भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांना पहिल्या पसंतीचे मत मिळविण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला. तर कांग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी जोरदार मुसंडी मारत नागपुर विभागातील सहाही जिल्ह्यांत पहिल्या पसंतीची मते मिळवत भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यावर 976 मतांची आघाडी घेतल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
नागपुर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत युवा ZEN G भाजप विरोधात गेल्याचे चित्र!
केंद्र व राज्य सरकार चे युवकांच्या नोकरी व रोजगाराकडे झालेले दुर्लक्ष,वारंवार होणारी पेपरफुट यावरुन सरकारच्या विरोधात संपुर्ण देशभरात काक्रोच जनता पार्टी चे आंदोलन झाले. कांग्रेस ही युवकांचे प्रश्न घेऊन सातत्याने सरकारविरोधात आंदोलनात उतरली होती. या आंदोलनात युवकांवर झालेला अमानुष लाठीचार्ज गुन्हे दाखल केल्याने केंद्र व राज्य सरकार वर युवा ZEN G प्रचंड नाराज झाला. भाजप नेते वारंवार दावा करीत होते कि पहिल्या फेरीत 1 लाखाच्या वर मते घेऊन महायुतीचे सुधाकर कोहळे प्रथम पसंतीचे मते घेऊन विजयी होतील. परंतु भाजप नेत्यांचा हा दावा नागपुर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत फोल ठरला. एकुण 84003 मतांपैकी 76875 मते वैध ठरली तर 7128 मते अवैध ठरली. पहिल्या फेरीच्या मतमोजणीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांना 28,998 मते तर महायुतीचे सुधाकर कोहळे यांना फक्त 28071 मते पडली. महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी यांना 976 मतांची आघाडी मिळाली आहे. पहिल्या पसंतीचे मत मिळण्यात भाजप महायुतीला आलेल्या या अपयशामुळे दुसऱ्या फेरीच्या मतमोजनीमध्ये भाजप नेते व उमेदवारात आता धाकधुक वाढली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपुर चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेसह नागपुरातील महायुतीचे आमदार खासदार यांनी सत्ता, पैसा, आणि निवडणुक आयोग यांच्या कथित कार्यप्रणाली च्या भरोश्यावर नागपुर पदवीधर मतदारसंघ निवडणुक जिंकणे भाजप ला आता कठिण जाते की काय? अशी चर्चा रंगली आहे. शेकडो बैठका वारंवार दौरे मतदारांना प्रलोभन देऊनही भाजप पदवीधर मतदारांचे मत आपल्याकडे वळविण्यात अपयशी झाल्याचा कांग्रेसच्या नेत्यांचा आरोप आहे. मतदारयाद्यात घोळ झाल्याचा आरोप करीत याआधी कांग्रेसच्या नेत्यांनी पत्रपरिषदेतुन भाजप व निवडणुक आयोगावर थेट हल्ला चढविला होता.
सर्वाधिक पदवीधर मतदारांची नोंद भाजप नेत्यांनी केली परंतु तरीही पदवीधरांनी भाजपकडे पाठ फिरवल्याने पदवीधरांकडुन हा भाजप नेते व सरकारवर नाराजीचा सूर उमटतांना दिसत आहे. यात कांग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी बाजी मारली हे मात्र नक्की. त्याचबरोबर पहिल्या फेरीत 14708 मते घेऊन अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांनी एकतर्फी लढा दिला. नितेश कराळे मास्तर हे या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचे गणित नक्की बिघडणार हे मात्र खरे आहे.

दुसऱ्या फेरीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल, पदवीधरांची आमदार कोण?
उर्वरित 80,000 मतांची मतमोजणी आता सुरु झाली असुन या फेरीत कांग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी, महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे व अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर या तिरंगी लढतीतुन कोण विजयी होईल हे मात्र लवकरच स्पष्ट होईल.
पदवीधरांची 7128 मते बाद होणे चिंतेचा विषय
पदवीधर मतदारसंघातील मतदार हे सुशिक्षित समजले जातात. पहिल्या पसंतीचे मतदान, दुसऱ्या पसंतीचे मतदान कसे करायचे यांवर महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्षाकडुन वारंवार मतदारांमध्ये जाऊन केले गेले परंतु तरीही नागपुर विभागातील सहाही जिल्ह्यांतील मतदारांची 7128 मते बाद झाली त्याचबरोबर अपक्ष व इतर पक्षाच्या उमेदवारांनी 5 हजारांच्या वर मते घेऊन नेमके गणित कोणाचे बिघडवले यांवर आज दिवसभर राजकीय गोटात चर्चा, तर्क वितर्क विश्लेषण रंगणार आहे.
पण एक मात्र गोष्ट तितकीच खरी आहे की नागपुर पदवीधर मतदारसंघातील ही निवडणुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या प्रतिष्ठेची केली होती.. त्या प्रतिष्ठेला पहिल्याच फेरीत मोठा धक्का बसला आहे.










