श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कोराडी /बोखारा/नागपुर :-20 एप्रिल 2026.
नागपुर जिल्ह्यातील कोराडी रोडवरील मार्डन स्कुल च्या मागे असलेल्या पाण्याच्या टाकीवर एक वैफल्यग्रस्त युवक सय्यद जामिर हुसेन वय 17 वर्ष रा. स्म्रृती नगर, बोखारा ग्रा. पं. हा युवक आज सकाळी 7 वाजता चढला आणि मानसिक तणावातुन.. तो आत्महत्या करणार असे अशी धमकी देत होता.प्राप्त माहितीनुसार सय्यद हुसेन हा स्म्रृती नगर येथे मागील 2 वर्षापासुन राहतो. सध्या तो मानसिक तणावात असल्याचेही समजते. त्याला एक मोठा भाऊ व आईसुद्धा आहे. मानसिक तणावातुन त्याने पाण्याच्या टाकीवर चढण्याचा निर्णय घेतला.


त्याला परिसरातील नागरिकांनी खाली उतरण्याची विनंती केली. पण तो लोकांचे ऐकत नव्हता. त्याला बघण्यासाठी शेकडो नागरिकांनी एकच गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश धुमाल हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. तब्बल 4 तास सय्यद हुसेन चा ड्रामा चालला. सय्यद च्या घरासमोर राहणारा त्याचा शेजारी अब्दुल तनविर वय 38 वर्ष याला पाण्याच्या टाकीवर सय्यद ने बोलावुन घेतले. अब्दुल तनविर ने सय्यद हुसेन ची समजुत काढली सरतेशेवटी अब्दुल तनविर याला यश आले. आणि सय्यद हुसेन याला पाण्याच्या टाकीवरुन सुखरुप उतरविण्याचे प्रयत्न यशस्वी ठरलेत आणि 4 तासांचे शर्थीचे प्रयत्न यशस्वी आत्महत्या करण्यापासून या युवकास जीवदान मिळाले.
लगेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश धुमाल यांनी या तरुणास ताब्यात घेऊन पुढील कारवाई साठी कोराडी पो. स्टे. ला घेऊन गेले.












