महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक रविंद्र साठेंच्या भीम गीतांच्या कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद!
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कोराडी /नागपुर :- 20 एप्रिल 2026.
प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व कोराडी औष्णिक विद्युत केंद्र तर्फे विद्युत विहार वसाहत कोराडी येथे विश्वरल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा परिक्षांचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात भोजनदान ही करण्यात आले. महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायक राहूल साठे व मुंबई येथील संच यांच्या भीम गीतांच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला महादूला व कोराडी येथील मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदविला.कार्यक्रमाला मुख्य अभियंता सुदिप राणे व अशोक भगत, अधीक्षक अभियंता किरण नानवटकर,राजेश रंगारी,समितीचे कार्याध्यक्ष हर्षद खंडारे, सचिव सुधीर मोहोड, सुनिल मिसळे, प्रवीण बुटे, महादूला नगरपंचायत उपाध्यक्ष वैशाली पखिड्डे ,नगरसेविका स्वाती पटले, संध्या साबळे, गंगा जैन ,आम्रपाली सोनारे, प्रतिभा गजभिये, पुजा मेश्राम,सर्वश्री पन्नालाल रंगारी, ईशांत मानवटकर, राष्ट्रगण चन्द्रशेखर,सचिन पाटील अमरजीत गोडबोले, लंकेश मेश्राम,आकाश उके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे सचिव सुधीर मोहोड, सुनील मिसळे, मयूर मानवटकर,अशोक पेंदोर, हृषिकेश खैरकर, आशिष आवळे, प्रशांत भारसाकळे, अमर रामटेके, अनिरुध्द खोब्रागडे, आश्विन शेंडे, पवण पाटील, अमरदीप नंदागवली, सुगत डहाट, गणेश कांबळे, दिनेश खंडारे, झोडापे,विजय बागडे, पंकज निकोसे, हर्षल निकोसे, रतन बोरकर, विजय धूर्वे, देवेंद्र वाघमारे तसेच जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.












