श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
भंडारा : 4 मे 2026
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत विचार विभागाच्या प्रदेश सरचिटणीस तथा विदर्भ नागपूर विभाग प्रभारी पदी म्हणून गणेश लिमजे यांचे नियुक्ती करण्यात आली.

सदर नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आ. हर्षवर्धन सपकाळ आणि विचार विभागाचे प्रदेशाध्यक्ष खलील सैफ सय्यद यांच्या आदेशाने गणेश लिमजे यांची नियुक्ती करण्यात आली.
आपले नियुक्तीचे श्रेय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र विधानसभा माजी अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले, भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना दिले.
नियुक्ती बद्दल कौतुक
भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर तसेच भंडारा जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयश्रीताई बोरकर, प्रदेश महासचिव जियाभाई पटेल, प्रदेश सचिव जय डोंगरे, रोजगार / स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष पवन मस्के, जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके, जिल्हा परिषद सभापती शितल राऊत, जिल्हा परिषद सदस्य प्रेम वनवे, भंडारा तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, अभिजित वंजारी, धनराज साठवणे, नगरसेवक कमल साठवणे, विवेक पडोळे, पृथ्वीराज तांडेकर इतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांनी गणेश निमजे यांचे अभिनंदन केले आहे.
गणेश लिमजे यांचा परिचय.
पत्ता :- डॉ आंबेडकर वॉर्ड , अशोक नगर भंडारा, तालुका – भंडारा, जिल्हा – भंडारा.
सामाजिक आणि राजकीय कार्य :-
१) सण २०१३ ला भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष पद भूषवले सण २०२१ पर्यंत कार्यरत होतो.
२) सण २०२१ मधे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागा तर्फे प्रदेश उपाध्यक्ष तथा विदर्भ समन्वयक म्हणून नियुक्ती झाली.
६ वर्षापासून नागपूर / विदर्भ विभाग मधे विदर्भातील ६ जिल्हे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर संघटन बळकट केलं.
३) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग प्रदेश उपाध्यक्ष तथा विदर्भ समन्वयक म्हणून सर्व कलावंत लोकांना न्याय मिळवून योजना त्याचा पर्यंत पोहचवल्या व त्यांना महाराष्ट्र शासन कडून मानधन देखील मिळून दिलं.
४) सण २०२५ ला एकता फाउंडेशन सामाजिक संघटना मधे महाराष्ट्र राज्य प्रभारी नियुक्ती झाली आणि सावित्रीबाई फुले राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२५ मध्ये सन्मानित करण्यात आले.
५) बेरोजगार युवा संघटना मधे सन – २०१६ मध्ये भंडारा जिल्हाध्यक्ष पदाची जवाबदारी मिळाली.
६) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये सन – २०२१ जिल्हा सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणून नियुक्ती झाली व ४ वर्ष कार्य केले.
अशा विविध संघटनेच्या माध्यमातून व राजकीय प्रवास करत आहे.
०३/०६/२०२६ ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विचार विभाग मधे प्रदेश सरचिटणीस तथा नागपूर विदर्भ प्रभारी म्हणून नियुक्ती झाली.
१३ वर्षापासून राजकारणात व सामाजिक कार्यात सक्रिय आहे.












