श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कोराडी /नागपुर : 2 सप्टेंबर 2026
काल दिनांक 01/09/2026 रोजी कोराडी महाजेनको 660 वीज प्रकल्पाच्या बाँयलर विभागाच्या युनिट 10 मध्ये 40 फुट उंचीवरुन काँईल उतरविण्याचे ओवरराल चे काम सुरु असतांना महारकुडा, अर्जुनी मोरगाव, गोंदिया येथील कंत्राटी कामगार मारुती मेश्राम यांचा झालेल्या म्रृत्यु विषयी झालेल्या दुर्घटनेसंदर्भात कोराडी महाजेनको प्रशासनाने नुकताच खुलासा पाठवला आहे.

महाजेनको कोराडी प्रशासनाने याविषयी अधिक माहिती देताना सांगितले, की युनिट क्र. 10 (3 × 660 MW), KTPS, कोराडी येथे ओव्हरहॉलचे काम सुरू असताना, M/s L&T-MHI Power चे कामगार मारुती मोतीराम मेश्राम ( वय-58) हेल्पर, यांनी जेवण केल्यानंतर अचानक अस्वस्थ वाटल्यामुळे ते आराम करण्यासाठी बसले व जेवणानंतर मेश्राम यांना दोन वेळा उलटी झाली आणि अस्वस्थ वाटत असल्याबदलची महिती त्यांनी साईट सूपरवायजरला दिली. साईट सूपरवायजर यांनी उपचारासाठी त्यांना तात्काळ रात्री 09.35 pm च्या सुमारास मेयो हॉस्पिटल, नागपूर येथे भरती केले.
मेयो हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्यांच्या लक्षणांवर आधारित उपचार सुरू केले व तात्काळ ईसीजी (ECG) करण्यात आली व त्यानंतर डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका असल्याचे निदान केले.मारुती मेश्राम यांना वैद्यकीय उपचारादरम्यान दुर्दैवाने दुःखद निधन झाले.
पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सदर घटनेची नोंद करण्यात आली. अशी माहिती महाजेनको कोराडी प्रशासनाने एका प्रेस नोट द्वारे कळविले.











