श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 8 आँक्टोबर 2026.
नागपुर पदवीधर मतदारसंघातील भाजपचे नेते असलेले डॉ. आल्हाद भांडारकर यांनी “पार्टीकडे मी उमेदवारी मागणे ही माझा अधिकार आहे आणि संविधानाच्या चौकटीतच राहुन पदवीधर निवडणुक लढवणे हा माझी भुमिका आहे असे स्पष्ट सांगत डॉ. आल्हाद भांडारकर लाखनीकर यांनी भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या विरोधात आपले बंड पुकारले आहे.
भंडारा गोंदिया जिल्ह्य़ातील शिक्षण महर्षी बापू साहेब लाखाणीकर यांचे नातू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अनेक दशकांपासून जोडलेले आल्हाद भांडारकर यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. आल्हाद भांडारकर (लाखनीकर) हे भंडारा जिल्ह्यातील एक शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी चे अध्यक्ष आहेत.
थोडक्यात परिचय व पार्श्वभूमी
मूळ आणि कुटुंब: ते शिक्षणमहर्षी बापूसाहेब लाखनीकर यांचे नातू आहेत. त्यांच्या कुटुंबाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाशी (BJP) दीर्घकाळ संबंध राहिला आहे.
शिक्षण: त्यांनी बी.एस्सी. (कृषी) आणि एम.बी.ए. (MBA) पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
शैक्षणिक व सामाजिक कार्य
राष्ट्रीय शिक्षण संस्था: ते लाखनी येथील राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. ही संस्था भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय, वसतिगृह आणि पुस्तके चालवते.
सामाजिक व राजकीय पदे:
डॉ. आल्हाद भांडारकर हे ‘शिक्षणमहर्षी बापूसाहेब लाखनीकर चॅरिटेबल फौंडेशन’चे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत.
“भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या इतर जिल्ह्यांमध्ये काय योग्य पदवीधर उमेदवार नाहीत का? भाजप पक्षनेते हे नेहमी नागपुर ला प्राधान्य देतात परंतु पदवीधर मतदारसंघात एकुण 6 जिल्हे असुन या जिल्ह्य़ात सक्षम उमेदवार असुनही नेहमी त्यांच्यावर अन्याय का? ” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ असलेल्या भांडारकरांचे भंडारा जिल्ह्यात मोठे शैक्षणिक जाळे आहे. डॉ. आल्हाद भांडारकर यांच्या दमदार उमेदवारीमुळे नागपुर पदवीधर मतदारसंघातील ही निवडणुकीत रंगत वाढण्याची शक्यता आहे.मागे हटणार नाही निवडणुक लढणार आणि जिंकुन दाखवणार असा आत्मविश्वास डॉ. आल्हाद भांडारकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
बेरोजगार पदवीधरांसाठी शासकीय, खाजगी पदभर्ती साठी वेळोवेळी मार्गदर्शन शिबीरे स्पर्धा परिक्षा, यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ात यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणे शासकीय भर्ती करिता कंत्राटी पद्धतीने परिक्षा घेण्यासाठी खाजगी संस्थांना कंत्राटे देणे याविरुद्ध आवाज उचलणे तसेच सभागृहात परीक्षा पेपरफुट विरोधात आवाज उचलणे व बेरोजगार पदवीधरांसाठी रोजगार कौशल्ये विकसित करण्यासाठी रोजगार निर्मिती वर भर देणे हा एजंडा डॉ. आल्हाद भांडारकर यांचा आहे.












