श्री. सुनील उत्तमराव साळवे (9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी/नागपुर :8 आँक्टोबर 2026.
नागपुर जिल्ह्यातील सहकार महर्षी बाबासाहेब केदार मार्केट यार्ड कामठी (क्रृ.उ.बा.स) चे माजी सभापती तथा विद्यमान संचालक तथा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती हुकमचंद आमधरे यांच्या वाढदिवसानिमित्त कृउबा समितीच्या कार्यालयात आयोजित एका सामाजिक उपक्रमात त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सहकार क्षेत्रात मागील 25 वर्षापासुन सक्रीय योगदानाबद्दल कांग्रेसचे जेष्ठ नेते हुकुमचंद आमधरे यांना कामठी विधानसभेचे माजी आमदार देवराव रडके,माजी आमदार एस क्यु जामा, कामठी विधानसभेचे नेते सुरेशभाऊ भोयर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या!



कांग्रेस नेता हुकुमचंद आमधरे यांच्या वाढदिवसानिमित्त कामठी येथील कस्तुरचंद डागा बालसदन, बालगृह व अनाथालयातील बालकांना कामठी क्रृ.उ.बा.स चे उपसभापती कुणाल इटकेलवार यांच्या हस्ते फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी जि. प. सदस्य दिनेश ढोले,कामठी नगर परिषद गटनेता काशीनाथ प्रधान, माजी न. प.सभापती नीरज लोणारे, घोरपडचे माजी सरपंच प्रवीण कुथे , समितीचे संचालक भाउराव गोरेकर, रमेश गोमकर, कृष्णा करडभाजणे, रामकृष्ण प्रगट, सूर्यभान करडभाजणे, सुधीर शहाणे, लता आखरे, अमोल खोडके, नवलिकशोर दुडमल, ज्ञानेश्वर वाघ, मोहम्मद सुलतान, अतुल कांबळे, नामदेव डंगोले, भगवान वानखेडे, तुकाराम आतुककर, लहानभाई ठाकरे, मनोहर आखरे, गणेश धुले, रवि पवार, आनंद पेटेकर, बळीरामजी राऊत, बंडु वाघ, सुरेश दिघोरीकर यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी व कर्मचारी उपस्थित होते.











