श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी /नागपुर : 22 आँक्टोबर 2026.
नागपुर जिल्ह्यातील कामठीच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील धम्मचक्र प्रवर्तन महोत्सवात पहिल्यांदाच महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आऊट झाल्याचे व शिवसेना शिंदे पक्षाचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व कांग्रेसचे खा. शामकुमार बर्वे इन झाल्याचे चित्र दिसुन आले.
कामठीच्या राजकारणात माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांचा दबदबा आहे. मागील 30-35 वर्षाच्या राजकारणात सक्रिय सहभाग असलेल्या माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल मध्ये मागील 15 वर्षापासुन प्रमुख पाहुणे म्हणून दिसणारे नागपुर चे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पहिल्यांदाच कामठीच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल महोत्सवात गायब झालेले बघण्यात आले.


नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दसऱ्यानिमित्त “रावणदहन” कार्यकम व भोजनदान कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यासह रमलेले दिसले.कामठी नगरपरिषद चे अध्यक्ष अजय अग्रवाल व भाजप तर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिनी एका भोजनदान कार्यक्रमात उपस्थित राहिलेले बघितले परंतु ते ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या परिसरात आयोजित धम्मचक्र महोत्सवात मात्र दिसले नाही हे विशेष! बावनकुळेंनी मुद्दाम ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे जाणे बहुधा टाळले असावे. याला कारणीभूत ठरली ती कामठी नगरपरिषद निवडणुक. कामठी नगरपरिषद नगरपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवार अजय अग्रवाल यांच्या निवडणुकीमध्ये धांदली व वोट चोरी झाल्याचा थेट आरोप जनतेपुढे मीडिया तुन सुलेखाताई कुंभारे यांनी उचलला होता आणि त्यांनी थेट भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या निवडणुकीत भाजप व बरिएमं चे दोन्ही उमेदवार अजय अग्रवाल व अजय कदम हे दोघेही एकमेकांविरुद्ध ठाकले होते. अजय अग्रवाल साठी बावनकुळेंनी साम दाम दंड भेद नीती नुसार जंग पछाडले तर अध्यक्षपदावरून महायुती फिस्कटली. त्यानंतर सुलेखाताई कुंभारे यांनी बावनकुळेंवर आक्रमक पद्धतीने वार केले हीच गोष्ट बावनकुळेंना रुचली नाही. सुलेखाताई आणि बावनकुळे यांच्यात वैचारिक द्वंद सुरु झाले. असे म्हटले जाते की, बावनकुळेंनी चिडुन सुलेखाताई कुंभारे यांना मानहानीची नोटीस ही पाठविल्याचे समजते. त्यानंतर बावनकुळें विरोधात कामठीतील आंबेडकरी समाजात तीव् रोष निर्माण झालेला ही बघितला.
नुकताच कामठीच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात दोन दिवसीय धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. लाखों आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी तिथे दिसली, पण तिथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दिसले नाही. एरव्ही नेहमीच ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील धम्मचक्र महोत्सवात ते स्वतः हुन आवर्जून भेट द्यायचे मिळालेल्या माहितीनुसार पालकमंत्री बावनकुळे यांना यावर्षी च्या धम्मचक्र महोत्सवात सुलेखाताई यांनी निमंत्रण दिले नाही ? सुलेखाताई कुंभारे ह्या बावनकुळेंवर तीव् नाराज असल्याचे ही समजते. बावनकुळेंनी मानहानीची नोटीस सुलेखाताई कुंभारे यांना पाठवण्याची टोकाची भूमिका का घेतली असावी? कामठीत पहिल्यांदाच महायुतीचे घटक दल असलेल्या बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या नेत्या सुलेखाताई कुंभारे यांचा भाजपच्या जाहिरनाम्यावर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत फोटो चेहरा नाही. नागपुर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा जाहिरनामा बनवतांना बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या नेत्या सुलेखाताई कुंभारे यांचा फोटो मुद्दाम भाजप पक्षाने का टाकला नाही याबाबत जनतेत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. सुलेखाताई कुंभारे ह्या स्नवतःहुन भाजप महायुतीतुन बाहेर पडल्या नाहीत.त्यांना मुद्दाम महायुतीतुन डावलण्यासाठी ही रणनीती भाजप नेत्यांनी रचली असावी. नागपुर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या गैरहजेरीत भाजप मैदानात उतरली. त्यामुळे कामठीतील आंबेडकरी पदवीधर मतदारांनी महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना मते दिली कि त्यांनी कोहळे विरुद्ध मतदान केले? अशा शंका यानिमित्ताने निर्माण झाले आहे.
पहिल्यांदाच कांग्रेसचे रामटेक चे खा. शामकुमार बर्वे व शिंदे सेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या धम्मचक्र महोत्सवात एंट्री! पहिल्यांदाच कांग्रेसचे रामटेक चे खासदार शामकुमार बर्वे व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची ड्रॅगन पॅलेस टेम्पल धम्मचक्र प्रवर्तन महोत्सवात झालेल्या एंट्रीमुळे कामठीवासियांना आश्चर्याचा धक्का बसला. युतीची नवी समिकरणे जुळताना दिसत आहे. मागील 25 वर्षापासुन सातत्याने कांग्रेस चा होत असलेला पराभव यामुळे भविष्यात कांग्रेस सोबत बहुजन रिपब्लिकन एकता मंच ची युती सुद्धा होण्याचे दाट संकेत मिळत आहेत. भाजप ला पराभुत करण्यासाठी जुना मित्र पक्ष असलेल्या बहुजन रिपब्लिकन एकता मंचला महाविकास आघाडी त आणणे ही काळाची गरज असल्याचे कांग्रेसचे जेष्ठ नेते खाजगीत चर्चा करतात. कामठी शहरात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सातत्याने होत असलेली पीछेहाट व वरुन सुलेखाताई कुंभारे यांची तीव् नाराजीचा फटका भविष्यात भाजप महायुतीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.










