श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक VANSH NEWS Digital Web portal online.
नागपूर : 23 आँक्टोबर 2026.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे आणि तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही प्रक्रियेत मतदानाचे महत्त्व अधोरेखित करत दोन्ही उमेदवारांनी मतदान केले.
मतदान प्रक्रियेकडे राजकीय वर्तुळासह पदवीधर मतदारांचे लक्ष लागले आहे. पदवीधर मतदारसंघातील मतदान आणि निवडणुकीच्या पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.


नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात आज ॲड. अभिजित वंजारी यांच्या विजयासाठी माजी मंत्री तथा आमदार डॉ. नितीन राऊत यांनी मतदानाचा हक्क बजावला! यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक गौतम आंबादे, नगरसेविका कल्पना द्रोणकर, भावना लोणारे आणि काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणे ही आपली जबाबदारी आहे असे यावेळी डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी मतदानाचा हक्क बजावला. याप्रसंगी त्यांच्यासोबत महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे उपस्थित होते.

प्रा. MLC Prof. Anil Sole यांनी सुद्धा नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदान केंद्रावर भेट देत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी नागपुर पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे उपस्थित होते.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ साठी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. तसेच अधिकाधिक पदवीधर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी रामटेक तहसील कार्यालयात सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला!
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आज रामटेकचे आमदार तथा विद्यमान राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी रामटेक तहसील येथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी सर्व पात्र पदवीधर मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क अवश्य बजावावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यानंतर त्यांनी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रामटेक, पारशिवनी, कन्हान व अरोली येथील महायुतीच्या मतदान बूथना भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.


कामठीत कांग्रेस नेता सुरेशभाऊ भोयर यांचे मतदान

कामठी विधानसभेतील काँग्रेसचे नेते सुरेशभाऊ भोयर (माजी अध्यक्ष नागपुर जिल्हा परिषद) यांनी कामठीत आपल्या परिवारासह मतदानाचा अधिकार बजावला. व जास्तित जास्त पदवीधर मतदारांनी मतदान करुन लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले.यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मुलगा अनुराग भोयर (युवा कांग्रेस नेते) हे ही उपस्थित होते.

आमदार मोहन मते यांनी दक्षिण नागपुरातील मतदानकेंद्रावर घेतला आढावा

आज नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना दक्षिण नागपूरातील सक्करदरा येथील मतदान केंद्राला भेट देऊन मतदान प्रक्रियेची व सुरू असलेल्या व्यवस्थेची माहिती घेतली यावेळी भाजप चे वरिष्ठ नेता निरिक्षक प्रकाश टेकाडे हे उपस्थित होते.
निरीक्षक प्रकाशजी टेकाडे यांची बूथ क्रमांक 32 खापरखेडा येथे भेट त्यावेळी सर्व भाजप पदाधिकारी माजी पं. स. सदस्य किशोर चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.

सावनेर चे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क तसेच खापरखेडा मतदान केंद्रास दिली भेट

सावनेर कळमेश्वर विधानसभेचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी नागपुर महानगरपालिका च्या मतदान केंद्रावर आपल्या पत्नीसह जाऊन मतदानाचा हक्क बजावला. तसेच भाजप चे आ. डॉ. राजीव पोतदार यांनी सुद्धा खापरखेडा मतदान केंद्रावर भेट देत आढावा घेतला. यावेळी भाजप नेते किशोर चौधरी हे ही उपस्थित होते.
आम्ही तर मतदान केलं, तुम्ही पण नक्की करा!-कुंदा राऊत यांचे मतदारांना आवाहन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026 अंतर्गत आज तहसील कार्यालय, नागपूर येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. चला, लोकशाहीच्या या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवूया आणि आपल्या मताधिकाराचे महत्त्व जपूया असे आवाहन नागपुर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी यावेळी मतदारांना केले.

रामटेक विधानसभेतील कांग्रेसच्या बुथवर माजी मंत्री राजेंद्र मुळक मतदारांना नावाची चिठ्ठी देतांना

कन्हान व पारशिवणी येथे माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी आज रामटेक विधानसभा क्षेत्रात विधानपरिषद पदवीधर मतदारसंघातील बुथवर जाऊन भेट घेतली.. याप्रसंगी कन्हान नगर परिषद व पारशिवणी नगर पंचायत येथील मतदान बूथवर भेट देऊन मतदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती असून, उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी सांगितले.
आम्ही तर मतदान केलं, तुम्ही पण नक्की करा! – कुंदा राऊत (माजी उपाध्यक्ष नागपुर जिल्हा परिषद)

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ अंतर्गत आज तहसील कार्यालय, नागपूर येथील मतदान केंद्रावर जाऊन नागपुर जिल्हा परिषद च्या माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. चला, लोकशाहीच्या या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवूया आणि आपल्या मताधिकाराचे महत्त्व जपूया असे यावेळी त्यांनी आवाहन केले.










