केटिपिएस कंजुमर सोसायटी ला HP गैस धारकांना सेवा देता येत नसेल तर येत नसेल तर इंडेन,/भारत गैसची नविन एजंसी मंत्र्यांनी पांजरा कोराडी गावात आणा – अँड. नितीन वैद्य यांची मागणी
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital Web portal online.
पांजरा (कोराडी) :8 एप्रिल 2026.
इराण- ईजराईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गैस सिलेंडर च्या तुटवड्यावर अजुनही कोणताच कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही. मागील 20-25 दिवसापासून महादुला कोराडी परिसरात HP गैस ची टंचाई निर्माण झाली आहे. या परिसरात एकमेव केटिपिएस कंजुमर सोसायटी असुन जिच्या मार्फत HP गैस सिलेंडर चे वितरण होते. 2 दिवसांनी पुरवठाधारकांकडुन गैस सिलेंडर भरलेले ट्रक यायचे परंतु केटिपिएस कंजुमर सोसायटी च्या गोडाऊन परिसरात ग्राहकांची पहाटे 5 वाजेपासून लांब रांगा लागणे सुरु होते. पालकमंत्री बावनकुळे व जिल्हाधिकारी नागपुर यांनी जनतेला आवाहन केले होते कि पैनिक होऊ नका सिलेंडर चा मुबलक साठा आहे. मग आम्ही 15 दिवसापासुन नंबर लाऊन ही आमच्या घरी सिलेंडर पाठवले नाही. केटिपिएस कंजुमर सोसायटी च्या संचालकांनी 1 एप्रिल पासुन आमच्या परिसरात घरपोच सिलेंडर ची गाडी पाठवणार असे आश्वासन दिल्यानंतरही आमच्या कोराडी पांजरा परिसरात सिलेंडर ची गाडी येत नाही, एकमेव सोसायटी ने हजारो सिलेंडरचे कनेक्शन महादुला कोराडी, बोखारा, सुरादेवी वारेगाव नांदा, लोणखैरी बाभुळखेडा गुमथी गुमथळा नारा या गावात वाटल्याने आज खास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ग्रृहक्षेत्र असलेल्या पांजरा कोराडी भागातील नागरिकांना सिलेंडर मिळत नाही. केटिपिएस कंजुमर सोसायटी ला जर आपले HP गैस सिलेंडर सांभाळता येत नसतील तर भारत /इंडेन कंपनी नविन गैस एजंसी आमच्या पांजरा कोराडी भागात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणावी अशी मागणी परिसरातील नामांकित वकिल अँड. नितीन वैद्य यांनी केली.

अँड नितीन वैद्य म्हणाले कि आम्ही 15 दिवसांआधी नंबर लाऊन ही गैस सिलेंडर मिळत नाही.आमच्या परिसरातील नागरिक केटिपिएस कंजुमर सोसायटी गोडाऊन कडे रांगेत उभे राहिले. परंतु त्यांना तिथे सिलेंडर मिळाले नाही. सिलेंडर चा स्टाँक संपल्याने नागरिकांना घरी परत यावे लागले आहे. सिलेंडर साठी रांगेत काही ब्लैक मार्केटिंग करणारे व्यक्ति उभे राहत आहेत. जे 4-5 सिलेंडर दर दिवशी घेऊन जातात. आमच्या परिसरातील रांगेत लागलेल्या रांगेत लागलेल्या नागरिकांना हे ब्लैक मार्केटिंग करणारे लोक जवळ येऊन विचारतात. भाऊ सिलेंडर लागते का? 2 हजार रुपए लागेल. यावरुन असे वाटते कि एजंसीचा अशा सिलेंडर चे ब्लैक मार्केटिंग करणाऱ्यांना संरक्षण तर नाही ना? यांना एवढे सिलेंडर कसे मिळतात? असा प्रश्न अँड नितीन वैद्य यांनी विचारला.
अँड. नितीन वैद्य सारख्या शेकडो नागरिकांवर चुलीवर स्वयंपाक बनवण्याची आली वेळ

ते पुढे म्हणाले की, भाजपाच्या पदाधिकारी यांना एका फोनवर घरापर्यंत सिलेंडर मिळते. आम्हाला घरापर्यंत गाडी केव्हा येणार? आज आम्हाला खरोखर चुलीवर स्वयंपाक बनवण्याची ही वेळ आली आहे. कोराडी गावापासून आम्हाला तोडुन वेगळी ग्राम पंचायत पालकमंत्री बावनकुळेंनी बनवल्याने आज आम्हाला घरगुती गैस सिलेंडर चा समस्या निर्माण झाली आहे. आमची समस्या आता कोण सोडवणार. आमच्या लगत असलेल्या नारा गावाला आमच्या पांजरा गावात समावेश करुन आमच्या गावात भारत /इंडेन ची नविन गैस सिलेंडर एजंसी आणावी अशी मागणी यावेळी अँड. नितीन वैद्य यांनी केली.
महादुला कोराडी (नागपुर) येथील सामाजीक कार्यकर्ते आयु. संजय रामटेके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎂🎂🎉🎉🎉










