श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
हिंगणा : 7 एप्रिल 2026.
हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना उघडकीस आली आहे. सेवानिवृत्त सैनिक गोपाल तुकाराम ठाकरे (वय अंदाजे 50 वर्ष) यांच्यावर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला करून लूट करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशन, नागपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी दुपारी आरोपी सतीश भाऊराव शाहाकार, त्याचा मुलगा सागर सतीश शाहाकार आणि स्वप्नील सतीश शाहाकार यांनी जुना वाद उकरून काढत फिर्यादीला घराजवळ अडवले. “मारून टाकतो” अशी धमकी देत त्यांना खाली पाडून बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले.
सेवानिवृत्त माजी सैनिक गोपाल ठाकरे यांचे सोबत पत्रकार गजानन ढाकुलकर






सेवानिवृत्त माजी सैनिकांवर हल्ला करणारा भाजप चा वानाडोंगरी ग्रा. पं. चा माजी सरपंच सतिश शाहाकार

हल्ल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन, मोबाईल आणि चष्मा जबरदस्तीने हिसकावून घटनास्थळा वरून पलायन केले. जखमी अवस्थेत ठाकरे यांना तातडीने रुग्णालयात उपचार करण्यात आले असून अजूनही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सदर प्रकरणातील मुख्य आरोपी सतीश शाहाकार हे भाजपा चे कार्यकर्ते असुन त्यांच्या पत्नी वर्षां शाहाकार ह्या वानाडोंगरी नगरपंचायत च्या माजी नगराध्यक्ष होत्या.
या प्रकरणी वानाडोंगरी एमआयडीसी पो. स्टे. चे API
हेमंत कोकणी यांनी आरोपी सतीश शाहाकार, स्वप्निल शाहाकार, सागर शाहाकार यांचे विरोधात भारतीय दंड संहिता कलम 296, 115(1), 351(2), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, मुख्य आरोपी सतीश शाहाकार याच्यावर यापूर्वी फसवणुकीचा (420) गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे, तर स्वप्नील शाहाकार याच्यावरही अॅट्रॉसिटीसारखे गंभीर गुन्हे नोंद असल्याचे समजते.
दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक घटनेमुळे वानाडोंगरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिस प्रशासनाने आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी जागरूक नागरिकांकडून होत आहे.










