श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक.
Vansh News Digital Web portal online.
महादुला नगरपंचायत /नागपुर : 12 एप्रिल 2026.
नागपुर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायत क्षेत्रात कांग्रेस ला मोठा झटका बसला असून. कांग्रेसचे महादुला शहराध्यक्ष अमोल (मोंटु) कुथे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह काल रात्री महसुलमंत्री तथा नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.


गत महादुला नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्र. 2 मधुन निवडणुक लढलेले अमोल कुथे यांचा अवघ्या 12 मतांनी पराभव होऊनही त्यांची जनतेत मनमिळाऊ, जनतेच्या समस्येसाठी आक्रामक स्वभावाची जोरदार चर्चा होती. जनतेच्या छोट्या छोट्या समस्येसाठी वेळोवेळी धावणारे अमोल कुथे यांना निवडणुक झाल्यानंतर कांग्रेसच्या नेत्यांनी अक्षरशः वाऱ्यावर सोडले होते. कांग्रेसच्या नवनिर्वाचित 5 नगरसेवकांना हाताशी धरुन गटस्थापनेसाठी ते कांग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे फिरले परंतु वरिष्ठ नेत्यांकडुन त्यांना कोणतेही सहकार्य मिळाले नसल्याची अमोल कुथे यांनी खंत आहे महादुला शहरात कांग्रेसचे साधे जनसंपर्क कार्यालय सुद्धा उपलब्ध करुन दिले नाही. खा. शामकुमार बर्वे यांचेकडुन बेरोजगारांसाठी कोणतीही ठोस उपाययोजना दिसत नसल्याने अमोल (मोंटु) कुथे यांनी शेवटी आपल्या कार्यकर्त्यांचे काम व्हावे यासाठी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. काल त्यांच्या भाजप पक्षप्रवेशावेळी त्यांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
काल यशवंत लाँन महादुला येथे झालेल्या भाजप पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे वेळी मंचावर राजेश रंगारी माजी नगराध्यक्ष महादुला, महादुला भाजप शहराध्यक्ष सचिन पाटील, नगराध्यक्षा हेमलता मनोज सावजी, उपाध्यक्ष वैशाली पवन पखिड्डे, गटनेता अभिजीत ढेंगरे,विदर्भ मच्छीमार मंडळाचे विदर्भ अध्यक्ष प्रेमकुमार गजभारे, व नगरसेवक, नगरसेविका व शेकडो भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.














