औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर?
श्री सुनील उत्तमराव साळवे. मुख्य संपादक – Vansh News Digital Web portal online.
(9637661378 /9527190782)
कोराडी /नागपुर : 13 एप्रिल 2026.
नागपुर जिल्ह्यातील कोराडी महाजेनको 660 वीज प्रकल्पातील युनिट क्र. 10 च्या OS सेक्शन मध्ये आज दुपारी 12 1 च्या दरम्यान हाँपर साफ करतांना गरम वाफ अंगावर उडाल्याने मोठी दुर्घटना झाली.


या दुर्घटनेत एकूण 8 कामगार जख्मी झाल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार झालेल्या दुर्घटनेत एडिशनल एक्जीक्यूटिव इंजिनियर विवेक पाटील वय 44,ए. के काजी(56) – टेक्निशियन 1, सचिन भागेवार (SE )- (47),तेजस सोनोने (EE) – (31), या महाजेनको कर्मचाऱ्यांसह निखिल जेतगुडे (28), कमलेश बारमाटे (32) गुनसिंग टिकम (50), विलास बंसोड (53)आदी कामगार गरम वाफ अंगावर उडाल्याने जख्मी झाले. त्यापैकी जणांना डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी विवेक पाटील, निखिल जैतगुडे व कमलेश बारमाटे यांना आयसीयु मध्ये एडमिट केले असुन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना रिकवरी व्हायला वेळ लागु शकतो अशी माहिती महाजेनको प्रशासनाकडून मिळाली आहे.
सर्व जख्मी कामगारांवर Max Hospital नागपुर येथे उपचार सुरू आहेत.. हाती आलेल्या माहितीनुसार विवेक पाटील, सचिन भागेवार, गुणसिंग टिकम, व तेजस सोनोने यांंना आयसीयु मध्ये दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रक्रृती स्थिर असल्याचे समजते.
कोराडी 660 मेगावॉट वीज केंद्रात सध्या वारंवार होणाऱ्या दुर्घटना मुळे औद्योगिक सुरक्षेचा मोठा प्रश्न समोर येत आहे. कामगार व कर्मचारी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाजेनको प्रशासन काय कडक पावले उचलतात याकडे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे मे. राज इंटरप्रायजेस कोराडी व मे. एम. एफ जैन यांचे कंत्राटी कामगार ही या दुर्घटनेत जख्मी झाले आहेत. सदर दुर्घटना कशामुळे घडली. घटनेला जिम्मेदार कोण आहेत याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.












