विशेष प्रतिनिधी
Vansh News Digital Web portal online.
महादुला कोराडी : 18 एप्रिल 2026.
नागपुर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायत येथील सिद्धार्थ नगर प्रभाग क्रमांक 9 मध्ये दिवंगत उत्तमराव साळवे लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.









16 एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत महाकारुणिक सिद्धार्थ गौतम बुद्ध तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास माल्यार्पण व दीपप्रज्वलन नगरसेवक सचिन वानखेडे तसेच दिवंगत उत्तमराव साळवे लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाजसेवी सुनील साळवे यांनी केले. त्यानंतर सामुहिक बुद्धवंदना घेण्यात आली.तत्पश्चात आयोजित भोजनदान कार्यक्रमात हजारो नागरिकांनी भोजनदानाचा आस्वाद घेतला.

यावेळी समाजसेवी पत्रकार सुनील साळवे यांचा वाढदिवस त्यांच्या हितचिंतक मित्रपरिवारातर्फे मोठ्या हर्षोत्सात साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी,माजी नगरसेविका सरस्वती लांडगे, सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रगण चंद्रशेखर, हंसराज (बंडुभाऊ) भोयर, कामगार नेते चैनदास भालाधरे, आकाश ऊके, पंकज शोर, राजाभाऊ साळवे, सिद्धार्थ सोनवणे, अंबादास साळवे, सुधिर धुरिया, पोर्णिमा भिलावे, विनोद लझडे, मनिष वासनिक,सुशांत शेवारे, अंतरिक्ष घोडगे, अनिकेत मेश्राम, अनिकेत रंगारी, विक्की खिल्लारे,मंगेश भेलावे, रविंद्र गायकवाड,विक्की हनवते,प्रशांत गायकवाड,करण साळवे, प्रकाश अंबादे, विशाल सोनवणे,पप्पू लांडगे,कविता साळवे, रमा सोनवणे, मनिषा ढाकणे, संगिता टापरे, प्रमिला गायकवाड, काजल लझडे,रंजना लांडगे पार्बती बगाटे आदी कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचा केक कापुन पत्रकार सुनील साळवे यांना शुभेच्छा दिल्या.
भीमजयंती निमित्ताने दिवंगत उत्तमराव साळवे लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे फटाख्यांची आतिषबाजी करण्यात आली.












