कंत्राटदार संदीप दिवाने व पेटी कांन्टैक्टर बावने यांचेकडुन सुरक्षा काळजी न घेतल्याने दुर्घटना घडल्याची चर्चा?
श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
खापरखेडा /नागपुर : 21 एप्रिल 2026.
नागपुर जिल्ह्यातील महाजेनको खापरखेडा 210 मेगावॅट वीज प्रकल्पात आज गंभीर दुर्घटना घडली असुन दुर्घटनेत बॉयलर मेंटेनन्स विभागात काम करणारा अस्थायी कामगार अनंता शेंडे रा. सिल्लेवाडा वस्ती यांचा कामादरम्यान करंट लागुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची चर्चा समोर आली आहे.
ही घटना आज सकाळी अंदाजे 11:30 वाजता घडल्याचे सांगितले जात आहे. सदर काम मे. एम टेक पाँवर कंपनीमार्फत सुरू असून,ही कंपनी कोराडी येथील संदीप दिवाने यांची असल्याची माहिती मिळत आहे.संदीप दिवाने हे नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अत्यंत निकटवर्तीय कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात.संदीप दिवाने यांच्या मे. एस टेक कंपनीमार्फतच हे काम पेटी कॉन्ट्रॅक्ट स्वरूपात भानेगाव येथील बावणे यांनी घेतल्याचे समजते.
21 एप्रिल 2026 रोजी मंगळवारला बाष्पक संधारण विभागात कर्तव्यावर असताना अनंता शेंडे यांनी कोळसा मिल डेक स्प्रिंगला लॅमिनेशन टेपने कव्हरिंग करण्याचे आपले काम पूर्ण केले होते काम संपवून परत येत असताना 210 मेगावॅट संचाच्या बीसी फोर सीएमआर (BC4 CMR) टनेलच्या मायनस लेव्हलवर ते अचानक जमिनीवर कोसळले व बेशुद्ध झाले. सदर घटनेची माहिती मिळताच वीज केंद्र प्रशासनाने त्यांना तातडीने खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचार केले यावेळी गांभीर्य लक्षात घेऊन मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर दुसरीकडे अनंता शेंडे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने झाला असेही सांगण्यात येत आहे. अनंता शेंडे यांचा मृत्यू नेमका करंट लागल्यामुळे झाला कि हृदयविकाराच्या झटक्याने झाला? हे अजुनही खात्रीलायक सांगता येत नाही. त्यांना नागपुरातील मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर पुढील तपासणीसाठी मेयो रुग्णालयात हलविण्यात आले.जोपर्यत मेयोउमधुन अनंता शेंडे यांचा PM रिपोर्ट येत नाही तोपर्यंत यांवर अधिक भाष्य करता येणार नाही.
खापरखेडा वीज केंद्रात कंत्राटदार सेफ्टी प्रिकाऊशन वापरत नसल्याची तक्रार
प्राप्त माहितीनुसार काही कंत्राटदार हे स्वतःच्या कंपनीच्या नावाने बिलो रेट मध्ये काम तर घेतात परंतु ते स्वतः काम न करता इतरांना पेटी मध्ये काम देतात. त्यामुळे कामाची क्वालिटी, कामगारांच्या सुरक्षा व्यवस्थेवर दुर्लक्ष होत असते. कित्येक कामांवर स्थायी कामगार कमी असतात. अस्थायी कामगार जास्त वापरले जातात जेणेकरून त्या कामगारांचा PF, ।ESIC सवलतीपासुन कंत्राटदार पळवाटा काढतात. बायलर मेंटेनन्स मध्ये कामावर असलेल्या भानेगावच्या , मृतक अनंता शेंडे यांचेकडे टेम्पररी गेट पास असल्याची माहिती समोर आली. म्रृतक अनंता शेंडे यांनी सेफ्टी शुज घातलेले नव्हते. सदर कामगारांकडे फक्त एकच दिवसाची तात्पुरती गेट पास कशी? सदर कामगारास कंत्राटदार संदीप दिवाने यांचे कंपनीमार्फत पेटी कांन्टैक्टर बावने यांनी सदर कामगारास सेफ्टी बुट, हातमोजे का दिले नाही? बायलर मेंटेनन्स मध्ये काम करण्याचा सदर कंत्राटदार कंपनीला अनुभव होता का? या कामगारास करंट कसा लागला? संबधित कंत्राटदार संदीप दिवाने व पेटी कांन्टैक्टर बावने यांनी कामगारांसाठी सेफ्टी टुल्स दिले होते की नाहीत?याची सखोल चौकशी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यांनी देखरेख का केली नाही? त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. खापरखेडा वीज केंद्रातील सर्व कंत्राटदारांचे सेफ्टी आँडिट करण्याचीही मागणी होत आहे.
सदर म्रृत कामगारांच्या कुटुंबियांना कंत्राटदार व महाजेनको खापरखेडा प्रशासनाच्या CSR निधीतुन आपदानिधी व त्याचे कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी देण्याची मागणी पुढे येत आहे.












