कंत्राटदार संदीप दिवाने यांचे कडुन म्रृतकाच्या परिवारास 2 लाखाचा धनादेश व 50 हजाराचा मय्यत फंड वितरित
श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
खापरखेडा /नागपुर : 21 एप्रिल 2026.
खापरखेडा वीज केंद्राचे मुख्य अभियंता यांनी VANSH NEWS Digital Web portal online ला पाठवलेल्या प्रेस नोटद्वारे दावा केला आहे की, खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगाराचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनंता शेंडे वय 45 असे मृत कामगाराचे नाव आहे. मृतक अनंता शेंडे M/s एम टेक पावर या कंपनी अंतर्गत कार्यरत होते.
21 एप्रिल मंगळवारला कर्तव्यावर असताना अनंता शेंडे यांनी कोळसा मिल डेक स्प्रिंगला लॅमिनेशन टेपने कव्हरिंग करण्याचे आपले काम पूर्ण केले व काम संपवून परत येत असताना 210 मेगावॅट संचाच्या बीसी फोर सीएमआर (BC4 CMR) टनेलच्या मायनस लेव्हलवर ते अचानक जमिनीवर कोसळले व बेशुद्ध झाले.
घटनेची माहिती मिळताच वीज केंद्र प्रशासनाने त्यांना तातडीने खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी मानकापूर येथील मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.


प्राथमिक माहितीनुसार अनंता शेंडे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. पण मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी अनंता शेंडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूर येथील शासकीय मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
खापरखेडा औष्णिक वीज केंद्र प्रशासन या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत असून मृत कामगाराच्या कुटुंबाप्रती संवेदना प्रकट करत आहे.म्रृतक अनंता शेंडे यांचा मृत्यू हा करंट लागल्याने झाला असल्याची अफवा आहे असेही एका जबाबदार अधिकाऱ्यांनी यावेळी दुरध्वनीद्वारे सांगितले.
म्रृत कामगाराच्या पत्नीस कंत्राटदारांकडून 2 लाखाचा चेक व 50 हजार रुपयांचा मय्यत फंड वितरित-कंत्राटी कामगार संघटनेच्या बैठकीत निघाला तोडगा

210 मेगावॅट वीज केंद्राच्या सर्व्हिस बिल्डिंग मध्ये कंत्राटी कामगार संघटना व वीज केंद्र अधिकाऱ्याची दुपारीच्या सुमारास संयुक्त बैठक झाली सदर बैठकीत महानिर्मितीच्या सीएसआर फंडातून 4 लाख रुपये देण्याचे ठरले असुन , कंत्राटदारांकडून 2 लाख रुपयांचा धनादेश, 50 हजार रुपये मैय्यत फंड यावेळी म्रृतकाच्या परिवारास देण्यात आला. मृतक कामगारांच्या पत्नीला नोकरी देण्याची मागणी कामगार संघठनांनी केली. यावेळी मुख्य अभियंता विवेक रोकडे, यांनी म्रृतकाच्या पत्नीस नोकरी देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती कामगार नेत्यांनी Vansh News Digital Web portal चैनल शी बोलतांना सांगितली. या बैठकीत उपमुख्य अभियंता सचिन देगवेकर, कार्यकारी अभियंता संदीप देवगडे, कल्याण अधिकारी आनंद वाघमारे, वैद्यकीय अधिक्षक डॉ मुकेश गजभिये, कंत्राटदार प्रतिनिधी विनोद लोखंडे, कंत्राटी कामगार संघटना नेते रोशन गोस्वामी, भुपेंद्र चतुर्वेदी, प्रवीण हाते, विनोद बन्सोड, विलास गुजरमाळे यांच्यासह पावर फ्रंट कामगार युनियन व भारतीय मजदूर संघ प्रतिनिधी हजर होते.












