मौदा नगराध्यक्ष राजा तिडके यांच्या नेतृत्वाखाली मौदा PI यांना निवेदन!
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital Web portal online.
मौदा /नागपुर : 21 एप्रिल 2026.
नागपुर जिल्ह्यातील मौदा तालुका भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आज मौदा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देत महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सातत्याने सोशल मीडिया तुन बदनामी करणारे रविराज साबळे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आज करण्यात आली.
निवेदनात भाजप नेत्यांनी सांगितले की, चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री तथा पालकमंत्री हे संपूर्ण राज्याची धुरा यशस्वी रित्या सांभाळून महाराष्ट्राला प्रगती पथावर विकसित करण्यासाठी रात्रदिवस मेहनत करत आहेत. परंतु काही समाज कंठक मागील काही दिवसापासून फेसबुक वाटसप व अनेक सोसल मिडिया च्या साइट वर महसुलमंत्री बावनकुळे यांना हेतू परस्पर बदमान करण्याच्या उदेशाने व त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा उदेशाने आक्षेपार्ह व बदनाम कारक पोस्ट नेहमी करत आहेत.


सदर पोस्ट ह्या निराधार असल्याचे पुरावे देवून ही रविराज साबळे व इतर समाजकंटक तसेच मौदा शहरातील विरोधी पक्षाचे काही कार्यकर्ते जाणीवपूर्वक बावनकुळे यांची बदनामी करण्याचे उदेशाने व स्वतःची जनमानसात वाहवाही करून घेण्यासाठी कोणत्याही पुराव्या शिवाय केवळ राजकीय देशातून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे व स्तानिक भाजपा कार्यकर्ता यांचे भावना दुखावत आहे करिता सायबर कायदे अंतर्गत रविराज साबळे व इतर तसेच स्थानिक विरोधी पक्षाचे आक्षेपार्ह पोस्ट करणारे कार्यकर्ते यांचा सोशल मिडिया वर शोध घेऊन कडक अशी कायदेशीर कार्यवाही करून त्यांचावर त्वरित योग्य तो गुन्हा नोंद करावा अशी मागणी मौदा शहराचे नगराध्यक्ष प्रसन्ना (राजाभाऊ) तिडके, भाजपा मौदा शहराध्यक्ष मुकेश अग्रवाल, मोरश्वर सोरते
, नगरसेवक सर्वश्री रमेश कुंभलकर, उमेश गभणे, पद्मावती चलमाणी, यांनी निवेदनाद्वारे केली.
यावेळी दुर्गा वैद्य, उर्मिला समर्थ, शिवराज माथुरकर दिपिका पोटभरे (नगरसेवक), बंटी हटवार, दशरथ वासनिक देवराव करडभाजने, राजेंद्र जयस्वाल, रोहित साठवणे, पवन वैद्य तुळसीराम पडोळे, सुषमा कुंभलकर राहुल पोटभरे, राहुल हटवार, वैभव कळंबे, दुर्गेश वैद्य, प्रकाश कुहीकर, गुड्डु पाथुरकर, चंद्रकांत पोटभरे, कुंदा पडोळे अजय झलके, अनिकेत बेहरे, रामाजी भुरे, संकेत झाडे रवी चव्हाण, प्रृथ्वीराज गुजर, रामाजी मते आदी निवेदन देतांनी प्रामुख्याने उपस्थित होते.












