महादुला नगरपंचायत व गोदरेज फिडबॅक फाऊंडेशन चैरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती आयोजन
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
महादुला नगरपंचायत /नागपुर : 22 एप्रिल 2026.
नागपुर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायत च्या देखरेखीखाली माझी वसुंधरा दिवस (पर्यावरण दिवस) परिसरातील ब्राईट स्काँलर स्कुल, सेवानंद विद्यालय, आणि सनराईज स्कुल मधील विद्यार्थ्यांत पर्यावरणाचे रक्षण करणे यासाठी व्रृक्षारोषण, परिसर स्वच्छता चे महत्व पटवुन देण्यात आले.

माझी वसुंधरा म्हणजे माझी पृथ्वी आणि तिचे रक्षण करणे म्हणजे मानवी जीवनाचे रक्षण करणे होय. जर वसुंधरा सम्रृद्ध असेल तर मानवी जीवन सुखी राहील. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वसुंधरेची शपथ विद्यार्थ्यांना देऊन निरोगी आयुष्य जगण्याचा संदेश शाळेतील विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आला.

या उपक्रमात महादुला नगरपंचायत च्या स्वच्छता व आरोग्य सभापती नंदाताई तुरक, सुरभी मैडम, बायस्कर सर, यांच्या देखरेखीखाली गोदरेज फिडबॅक फाऊंडेशन चैरिटेबल ट्रस्ट चे अजय कुमार, रजनी गजभिये, प्रिती वानखेडे, सोनाली खोब्रागडे, निकिता गजभिये, प्रिया सरोदे, मनिषा लाखोरकर यांनी आपले योगदान दिले.












