श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
खैरी(कामठी) /नागपुर : 29 एप्रिल 2026.
नागपुर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात असलेल्या खैरी ग्रा. पं च्या पोटनिवडणुकीत वार्ड क्र. 1 मधुन मोरेश्वर (बंडुभाऊ) कापसे यांचा दणदणीत विजय झाला असुन खैरी ग्रा. पं कार्यालयात आता त्यांचा आवाज 3 वर्षानंतर पुन्हा गाजणार आहे.
28 एप्रिल 2026 रोजी झालेल्या खैरी ग्रा पं च्या पोटनिवडणुकीत वार्ड क्र 1 मधुन मोरश्वर ऊर्फ बंडुभाऊ कापसे यांचा 65 मतांनी दणदणीत विजय झाला असुन त्यांना 188 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी पराग जंगम यांना 123 मते मिळाली. एकुण झालेल्या 316 मतांपैकी 188 मते घेत बंडुभाऊ कापसे यांचे खैरी ग्रा. पं. मध्ये पुनरागमन झाले आहे.

गत 3 वर्षाआधी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पत्नी चा सरपंचपदाच्या व त्यांचा सदस्यपदी भाजप व काँग्रेस च्या त्यांच्या विरोधक कार्यकर्त्यांनी ठरवुन पराभव केला होता.बंडुभाऊ कापसे हे नागपूर जिल्ह्यातील खैरी ग्रा. पं. चे आदर्श सरपंच होते त्यांच्या काळात त्यांनी केलेले विकासात्मक कार्याचा ठसा सर्वत्र उमटवला होता. परंतु बंडुभाऊ कापसे यांचे भाजप मध्ये प्रस्थ वाढु नये यासाठी भाजपांर्गत विरोधकांनी कांग्रेस सोबत हातमिळवणी करीत बंडु कापसेंचा ठरवुन पराभव केला होता. परंतु बंडु कापसे खचले नाही त्यांनी वार्ड क्र. 1 मध्ये बौद्ध समाजाच्या मतदारांशी थेट संपर्क प्रस्थापित करीत हा विजय ओढुन आणला. बंडु कापसे यांचा विजय खैरी ग्रा. पं. मध्ये आता कांग्रेस च्या सरपंच योगिता किशोर धांडे यांना डोकेदुखी ठरणार आहे.किशोर धांडे व बंडुभाऊ कापसे यांच्यात राजकीय वैमनस्य सर्व जानतात. किशोर धांडे यांनी याता झालेल्या निवडणुकीत बंडु कापसे यांना पाडण्याचे गणित बनविले पण बंडु कापसे यांनी त्यांचे गणित बिघडवित विजय खेचला. खैरी ग्रा पं मधील एकाधिकारशाही व मनमानी ला आता चपराक बसणार भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बंडुभाऊ कापसे यांचा आवाज पुन्हा एकदा खैरी ग्रा पं. कार्यालयात गाजणार हे मात्र खरे आहे. किशोर धांडे यांच्या पत्नी सरपंचा योगिता धांडे यांना आता सरपंचपद टिकवण्यासाठी आता तारेवरची कसरत करावी लागणार.
खैरी ग्रा पं. च्या पोटनिवडणुकीत मोरेश्वर (बंडुभाऊ) कापसे यांचा झाला दणदणीत विजय












