श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
बोखारा /नागपुर : 29 एप्रिल 2026.
नागपुर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभेतील बहुचर्चित बोखारा ग्रा. पं. च्या पोटनिवडणुकीत सरपंचपदी रणजित सिंह चौहान यांचा दणदणीत विजय झाला. कांग्रेस नेता माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदाताई राऊत यांचे त्यांना बोखारा-फेटरी जिल्हा परिषद सर्कल मध्ये निर्विवाद वर्चस्व यानिमित्ताने सिद्ध झाले.
कांग्रेस चे रणजितसिंह चौव्हान यांना आता झालेल्या पोटनिवडणुकीत 5304 मतांपैकी 2342 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे देवेंद्र ठाकरे यांना 2222 मते मिळाली. रणजितसिंह चौव्हान हे 120 मतांनी निवडून आले. तर माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ कंभाले यांचे लहान भाऊ सुरेश कंभाले यांना अवघ्या 660 मतांवर समाधान मानावे लागले.
बोखारा सरपंच पदी उमेदवारांना मिळालेली एकुण मते




बोखारा ग्रा पं. निवडणुकीसाठी हिंगणा विधानसभेतील भाजप आमदार समीर मेघे व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंबर कसली होती. भाजप चे आ. समीर मेघे यांनी देवेंद्र ठाकरे यांच्या साठी प्रचार दौरे सभा केल्या. बोखारा ग्रा पं. मध्ये 15 करोड रुपयांच्या घोटाळ्याचा प्रश्न विधानसभेत गाजला. तत्कालीन प्रभारी उपसरपंच रणजित चौव्हान यांच्याबद्दल भ्रष्टाचाराचे फक्त आरोप झाले. परंतु भ्रष्टाचारात रणजितसिंह चौव्हान कुठेही दोषी आढळले नाही. त्यानंतर भाजपच्या काही चमको कार्यकर्त्यांनी रणजित चौव्हान यांचेवर मनरेगा चा कथित घोटाळ्याचा आरोप केला. परंतु सुज्ञान जनतेने परत एकदा हे आरोप बिनबुडाचे असल्याचे आजच्या निकालातुन स्पष्ट केले.
माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदाताई राऊत यांचे कांग्रेस मध्ये निर्विवाद वर्चस्व

बोखारा फेटरी सर्कल मध्ये पुन्हा एकदा कुंदाताई राऊत यांची कांग्रेस खरी कांग्रेस असल्याचे आणि 15 करोड रुपयांचा कथित भ्रष्टाचार हे बिनबुडाचे आरोप तर नव्हता ना? हे आता पुन्हा एकदा सिद्ध करीत कांग्रेस च्या माध्यमातून भाजप आमदारांना एकप्रकारची चपराक बसविली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत 52 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, तसेच मागील 5 वर्षात कुंदाताई राऊत यांनी केलेल्या विकासकामाला मतदारांनी पावती दिली.
कांग्रेसच्या वर्षा सहारे ह्या सुद्धा 253 मते घेऊन विजयी झाल्या इथे रिना रुपेश पाटील यांचा पराभव झाला. त्यांना 206 मते मिळाली.
भाजपचे प्रशांत युवक आवळे यांना 452 मते मिळाली व ते विजयी झाले त्यांनी अँड. नितीन आवळे यांचा पराभव केला. त्यांना 418 मते मिळाली. कांग्रेसप्रणित पैनल चे विजयपाल आवळे यांना 214 मते मिळाली.
भाजपचे अल्तमश मुर्शिद खान (लल्ला) खान हे 643 मते घेऊन विजयी झाले. याठिकाणी कांग्रेसचे मोहम्मद शादाब अब्दुल वाहिद खान यांना 384 मते मिळाली.












