श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपूर 30एप्रिल 2026 :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीवर महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
या निर्णयानुसार, महाराष्ट्र विधिमंडळातील आ.मोहन मते आणि आ.चरणसिंग ठाकूर यांच्यासह जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेल्या राजेंद्र हरणे, धनंजय बापट, अविनाश खडतकर, राजाभाऊ ताकसाळे या चार सदस्यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये उकेश चव्हाण, आदर्श पटले, उदयसिंग उर्फ गज्जू यादव, नितीन महाजन, दिवाकर पाटणे, प्रकाश राऊत, किशोर पाटील, अमर टिचकुले, लहूकुमार बहते, अनिल अहीरकर, श्रीकांत शिवणकर, विनोद सातंगे, अनिता जाधव, सूरज गोजे यांना “विशेष निमंत्रित” म्हणून समितीवर स्थान देण्यात आले आहे.
या नियुक्त्यांमुळे जिल्हा नियोजन प्रक्रियेला अधिक बळकटी मिळणार असून विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व नव्याने नियुक्त सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्रित प्रयत्न करत नागपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नव्या सदस्यांना यशस्वी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.














