श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 1 मे 2026.
नागपुर ग्रामीण जिल्ह्यातील 1 अधिकारी आणि 5 अंमलदार यांना उल्लेखनिय कामगिरी करीता पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले त्याअनुषंगाने
नागपुर ग्रामीण जिल्ह्याच्या आस्थापनेवरील 1 पोलीस अधिकारी आणि 5 पोलीस अंमलदार यांना पोलीस खात्यातील त्यांच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी साठी अतिशय मानाचे पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.


आज दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी विभागीय आयुक्त कार्यालय, नागपुर येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सदर सन्मानचिन्ह प्राप्त नागपूर ग्रामीण जिल्ह्याच्या आस्थापनेवरील 1) रमेश सुदाम बरकते, उपविभागीय पोलीस अधिकारी, रामटेक उपविभाग, 2) कृष्णकुमार अवधेश्नारायण पांडे, सहा. पोलीस उपनिरीक्षक यंत्रचालक, बिनतारी संदेश विभाग ३) अरूण काशीनाथ जयसिंगपुरे, सहा पोलीस उपनिरीक्षक, नेम पोस्टे एमआयडीसी बोरी 4) ज्ञानेश्वर कवडुजी राउत, सहा पोलीस निरीक्षक, नेम. पोस्टे एमआयडीसी बोरी 5) महेंद्र रामाजी केसरे, पोलीस हवालदार, जिल्हा विशेष शाखा, नागपुर ग्रामीण आणि 6) राधेश्याम वामनराव कांबळे, पोलीस हवालदार, पोलीस स्टेशन उमरेड यांना पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. तसेच सिव्हील लाईन येथील पोलीस भवन, नागपुर येथे ध्वजारोहण समारंभादरम्यान पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या हस्ते वरील नमुद अधिकारी आणि अंमलदार यांना सन्मानित करण्यात आले.

हर्ष पोद्दार, पोलीस अधीक्षक आणि अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांनी वर नमुद अधिकारी आणि अंमलदार यांना शुभेच्छा दिल्या.












