श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
हिंगणा/नागपुर : 4 मे 2026.
हिंगणा येथील विश्व शांती वेणा बुद्ध विहार परिसरात बुद्ध जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेला “बुद्ध-भीम गीतांचा आंबेडकरी जलसा” मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाने सामाजिक प्रबोधन, समता आणि बंधुत्वाचा संदेश देत उपस्थितांना भारावून टाकले.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्रामणेर भंते अनिरुद्ध यांच्या हस्ते झाले प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवी सुभाष मानवटकर उपस्थित होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बारामतीचे आंबेडकरी विचारवंत काळुराम चौधरी यांनी कार्यक्रमाला दिशा दिली. मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात बौद्ध वंदना आणि दीपप्रज्वलनाने झाली,


प्रबोधनकारांनी आपल्या प्रभावी गायनातून महापुरुषांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवले प्रबोधनकार सुभाष कोठारे, भावेश कोटांगले, तनुजा नागदेवे, राणी तब्सुम व मदन रामटेके ,यांनी बुद्ध-भीम गीतांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या समतेच्या व मानवतेच्या विचारांचा प्रभावी संदेश दिला. त्यांच्या सादरीकरणामुळे उपस्थितांमध्ये जागरूकता आणि प्रेरणेची लाट निर्माण झाली.
कार्यक्रमाला हिंगणा परिसरातील नागरिकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती लाभली. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत या सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमाला भक्कम पाठिंबा दिला. कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर टाळ्यांचा कडकडाट होत होता, ज्यामुळे कलाकारांचा उत्साह अधिकच वाढला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले बौध्द समाज एकता परीषद हिंगणा चे अध्यक्ष सुरेश मानवटकर, स्वप्निल ढवळे, भीमराव फुलझेले, प्रमोद डुले, बंडू वानखेडे, संजय मून, महेश वासनिक, आशिष नगराळे, निलेश लांखडे, बबन फुलझेले, तनुजा झिलपे, बंडू बोंदाडे, अरविंद कुंभारे, भीमराव नगराळे, विलास मून, उत्तम मेश्राम, राजू गायकवाड, सुधीर बोरकर, राजू मेश्राम, प्रशांत दिवे, अरुण भगत, भाऊराजी कटके, गजानन पाटील आदींचा समावेश होता. त्यांच्या समन्वय आणि मेहनतीमुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. प्रसंगी उपस्थितांना सामाजिक समता, बंधुता आणि शिक्षणाचा संदेश देण्यात आला. बुद्ध आणि भीमराव आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित हा जलसा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न ठरता, समाजप्रबोधनाचा प्रभावी मंच ठरला, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.












