दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 12 मे 2026.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री गजानन शिक्षण सेवा संस्था हिवरी नगर नागपुर द्वारा संचालित प्रिआंती इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तरोडी (बु) शाळेची दहावी व बारावी परीक्षेत परीक्षेत 100 टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली. इयत्ता दहावी मध्ये 17 विद्यार्थ्यांना 90 % पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती आशिष तायवाडे Corporate Trainer, प्रा. अवंतिकाताई रमेशजी लेकुरवाळे अध्यक्ष ग.शि.से.स. तथा मा. सभापती म.बा.क. जिल्हा परिषद नागपुर, रमेश लेकुरवाळे सचिव ग.शि.से.संस्था, सतिष बरडे, सौ. संगीता भोयर, प्राचार्या सौ. नंदा ठाकरे, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण प्राप्त करणाऱ्या प्रथम क्र. साहिल जामगडे 95.40 % द्वितीय क्र. सुयश डोंगरे 94.20% तृतीय क्र. अनुष्का पाटील 94% तसेच 17 विध्यार्थी 90 % पेक्षा अधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले आणि बारावीमध्ये प्रथम क्र. पार्थ धोटे, द्वितीय क्र. नेहा निकाळजे, तृतीय क्र. लावण्या नागमोते तसेच उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे संचालक मंडळ तसेच प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत भविष्यातही असेच यश संपादन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षकांनी केले तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.












