श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नवी दिल्ली : 31 मे 2026.
मागील काही दिवसांपासून डॉ. राजीव पोतदार यांना विधानपरिषद ची उमेदवारी फायनल झाल्याच्या सोशल मीडिया मध्ये पोस्ट वायरल होत होत्या. काही यु ट्युब चैनल वर त्यासंदर्भात डॉ. पोतदार यांच्या मुलाखती वायरल झाल्या. त्यामुळे भाजपात अंतर्गत धुसफूस होती. वरिष्ठ भाजपा नेत्यांनी डॉ. पोतदार यांना अशा मुलाखती देऊ नये अशा सुचना मिळाल्या होत्या. भाजप निष्ठावंतामध्ये काही प्रमाणात निराशा होती. कारण काही इतर भाजप नेते ही विधानपरिषद तिकिटासाठी शर्यतीत होते. अशातच शिर्ष नेत्रृत्वाकडुन जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत आपण संयम ठेवावा. पार्टी हितासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सुचना डॉ. राजीव पोतदार यांना नेत्यांनी दिल्या होत्या. त्यानंतर डॉ. राजीव पोतदार यांनी सबुरी घेतली.
भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 11 जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात धाराशिव लातूर बीडमधून बसवराज पाटील, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपने आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या 11 उमेदवारांच्या यादीत नागपूरमधून डॉ. राजीव पोतदार यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.यादीतील अन्य प्रमुख उमेदवारांमध्ये प्रविण पोटे पाटील (अमरावती), प्राजक्त तनपुरे (अहिल्यानगर), आणि अरुण लखानी (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली) यांचा समावेश आहे.
कोण आहेत डॉ. राजीव पोतदार?
डॉ. राजीव भास्करराव पोतदार हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य असुन ते नागपूर ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आहेत.
शिक्षण: ते व्यवसायाने वैद्यकीय व्यावसायिक (MBBS, FCGP) असून नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे ‘पोतदार नर्सिंग होम’ चालवतात.
जन्म व बालपण: त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील खोलापूर येथे झाला असून ते शालेय व महाविद्यालयीन जीवनापासूनच अभ्यासू आणि मेरीट विद्यार्थी होते.
पक्षातील स्थान: ते भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते मानले जातात. त्यांनी नागपूर ग्रामीण भाजपाचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे संघटनात्मक काम पाहिले आहे.
निवडणूक: त्यांनी 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सावनेर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर कांग्रेसचे माजी कैबिनेट मंत्री सुनील केदार यांचे विरोधात निवडणूक लढवली होती.
नवीन घडामोडी: महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आणि संघटनात्मक पातळीवर त्यांच्या अभ्यासू नेतृत्वाची दखल घेत भाजपकडून त्यांचे नाव विधान परिषदेच्या (MLC) उमेदवारांच्या यादीत प्रमुखतेने चर्चेत राहिले आहे.
डॉ. राजीव पोतदार यांचे राजकीय पुनर्वसन कधी होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर भाजपमधील सर्वात अभ्यासु हुशार व संघठन कौशल्य असलेले जमिनी स्तरावरील वरिष्ठ नेत्रृत्व म्हणुन डॉ. राजीव पोतदार यांना ओळखले जाते. आज नागपुर विधानपरिषद साठी त्यांचे नाव जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपकडे जवळपास 600 च्या आसपास सदस्यसंख्या असल्याने त्यांचा नागपुर विधानपरिषद साठी विजय सुनिश्चित मानला जातो. तर दुसरीकडे कांग्रेसकडे संख्याबळ नाही. आणि अजुनही त्यांचा उमेदवार ठरला नाही.
भाजप नेता चंद्रशेखर बावनकुळे हे विधानपरिषद निवडणुक निर्विरोध होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु कांग्रेस कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही. त्यामुळे ही निवडणुक अटळ आहे.
डॉ. राजीव पोतदार हे उद्या आपला नामांकन अर्ज करणार दाखल. रामटेक जिल्ह्याचे प्रभारी भाजप चे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार हे उद्या सकाळी 9 वाजता विधानपरिषद चा नामांकन अर्ज भाजप पक्षातर्फे भरणार असुन पक्षाच्या वतीने उद्या नागपुरच्या संविधान चौकापासुन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठे शक्तिप्रदर्शन करीत रैली काढत आपला नामांकन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सुत्राकडुन मिळाली आहे.












