श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपूर : 27 मे 2026.
नागपुर जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले वसतिगृह प्रशासनाने अत्यंत गरीब असलेल्या शेतकरी कुटुंबातील आकांक्षा उके या विद्यार्थिनीला बाहेर काढण्याची नोटीस बजावल्यानंतर नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने हस्तक्षेप करत तिला फोन करून तुला वसतिगृह सोडण्याची अजिबात गरज नाही, काही अडचण असेल तर मला फोन कर, सरकार तुझ्या पाठीशी आहे, असा खंबीर धीर दिल्यामुळे त्या विद्यार्थिनीला मोठा दिलासा मिळाला.
शासकीय अधिकाऱ्यांच्या कथित हुकूमशाही आणि सूडबुद्धीच्या कारभाराचा धक्कादायक प्रकार नागपुरात नुकताच समोर आला आहे. सावित्रीबाई फुले वसतिगृह प्रशासनाच्या विरोधात वसतिगृहातील असुविधांबाबत आकांक्षा उके या विद्यार्थिनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आकांक्षा उके या शेतकरी कन्येला सावित्रीबाई फुले वसतिगृह प्रशासनाने बाहेर काढण्याची नोटीस बजावली.या प्रकरणाची माहिती मिळताच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने हस्तक्षेप करत तिला फोन करून तुला वसतिगृह सोडण्याची अजिबात गरज नाही, काही अडचण असेल तर मला फोन कर असा खंबीर धीर दिला.
अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबातील आकांक्षा उके ही नागपूर येथील शासकीय सावित्रीबाई फुले वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये वसतिगृहात कुलर आणि मूलभूत सुविधा नसल्याने विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येबाबत आकांक्षाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार केली होती. मात्र, वसतिगृह प्रशासनाने संबंधित विद्यार्थिनीवरच कारवाईचा बडगा उगारला. आकांक्षा एका प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग असतानाही ती नोकरी करत असल्याचे कारण पुढे करून तिला वसतिगृह रिकामे करण्याची नोटीस बजावण्यात आली. एवढेच नव्हे, तर मागील सहा महिन्यांचा निवास आणि भोजन खर्चही तिच्याकडून वसूल करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप तिने केला.
या संपूर्ण प्रकारानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः विद्यार्थिनीशी फोनवर संवाद साधत तिला धीर दिला. “तुला वसतिगृह सोडण्याची अजिबात गरज नाही. सरकार तुझ्या पाठीशी आहे. काही अडचण असेल तर थेट मला फोन कर,” असे आश्वासन त्यांनी दिले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्तक्षेपामुळे विद्यार्थिनीला दिलासा मिळाला असला,
याबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आकांक्षा उके या विद्यार्थिनी सोबत मी स्वतः संवाद साधला असून तिचे अनुभव ऐकले आहेत. हे प्रकरण गंभीर असून समाजकल्याण मंत्र्यांशी चर्चा करून संबंधित अधिकारी आणि वॉर्डनवर योग्य कारवाई केली जाईल.











