श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 1 जुन 2026.
नागपुर विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. भाजपचा उमेदवार काल रात्री 10 वाजता ठरला. डॉ. राजीव पोतदार यांना भाजपाने उमेदवारी दिली आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शन करीत जिल्हाधिकारी नागपुर यांच्या कडे केला.यावेळी महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेसह आ. आशिष देशमुख राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, आ. क्रृष्णा खोपडे, महापौर निता ठाकरे सह अन्य भाजप नेता उपस्थित होते.


तर दुसरीकडे विधानपरिषदेसाठी बहुमत नसल्याने कांग्रेस उमेदवार उभा करणार नाही, ही निवडणुक बिनविरोध होईल अशी अपेक्षा भाजप नेत्यांना होती. परंतु काहीही झाले तरी ही विधानपरिषद निवडणुक बिनविरोध. होऊ द्यायची नाही असे कांग्रेससह महाआघाडी पक्षाने ठरवले. त्यानंतर अखेरच्या क्षणी कांग्रेस ने पक्षातर्फे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. कांग्रेस चे प्रवक्ता अतुल लोंढे व महालगाव गुमथळा सर्कल चे माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले या दोघांचे उमेदवारी अर्ज शेवटच्या क्षणी आज नागपुर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आल्याची सुत्रांनी माहिती दिली. कांग्रेस ने इथे एक अतिरिक्त उमेदवार दिला. 4 जुन रोजी नामांकन अर्ज मागे घ्यायची तारीख असुन पक्षातर्फे केवळ एकच अर्ज राहणार असेही बोलले जात आहे.
सामान्य जनतेच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे, सामाजिक, शैक्षणिक व लोकहिताच्या विषयांवर ठामपणे भूमिका मांडणारे तसेच काँग्रेस पक्षाची विचारधारा प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम अतुल लोंढे करतात. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, शेतकरी, कामगार, युवक, महिला, विद्यार्थी तसेच वंचित घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून अतुल लोंढे यांची ओळख आहे.तर नागपुर ग्रामीण भागातील युवा अभ्यासु व संघर्षशील जनप्रतिनिधीं म्हणुन दिनेश ढोले यांची ओळख आहे.
कांग्रेस चे अतुल लोंढे व दिनेश ढोले यांच्या उमेदवारी दाखल करतांना कांग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार, रामटेक चे खासदार शामकुमार बर्वे, माजी मंत्री आ. नितीन राऊत,आ. अभिजीत वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी ग्रृहमंत्री अनिल देशमुख माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचेसह नागपुर शहर अध्यक्ष प्रफुल गुडधे पाटील,अश्विन बैस, शकुर नागाणी, रविंद्र चिखले नगरसेवक तसेच महाविकास आघाडीचे नेते प्रामुख्याने उपस्थित असल्याची माहिती सुत्राकडुन मिळाली.
विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी काँग्रेसचा उमेदवार ठरवण्याच्या उद्दिष्टाने काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक नागपूरात पार पडली. यात नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात शेवटी चार उमेदवार रिंगणात आहे. यात भाजपकडून राजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परिणामी भाजपने हि निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केलं होतं. मात्र अखेरच्या क्षणी काँग्रेसने अतुल लोंढे आणि दिनेश ढोले यांना जबाबदारी दिली आहे. तर सुरेंद्र लोधी, अपक्ष व राजेश जंगले, अपक्ष. असे उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यात काँग्रेस पक्षानेच फक्त अतिरिक्त उमेदवार दिला आहे कांग्रेस ने दाखल केलेल्या एबी फार्म वर अतुल लोंढे व दिनेश ढोले दोघांचे नाव असल्याचेही समजते.
गत विधानपरिषद निवडणुकीत भाजप कडुन चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी मिळाली त्यावेळी ही भाजप पक्षातर्फे निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला गेला. कांग्रेसचे छोटु भोयर यांनी माघार घेतल्याने कांग्रेसवर मोठी नामुष्की ओढवली होती. परंतु अचानक कांग्रेस ने अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन देऊन महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित केल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपुर विधानपरिषद निवडणुक कठिण केली. निवडणूक बिनविरोध न झाल्याने त्यावेळी पैशाचा मोठा घोडेबाजार चालला दोन्ही कडुन जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक मतदारांना पैशांची देवाणघेवाण झाल्याची मोठी चर्चा होती. आज तिच परिस्थिती भाजप पुढे आहे. नागपूर विधानपरिषद यंदा ही बिनविरोध होणार नाही. त्यामुळे यावेळी मतदारांची चांदी होणार आहे. पैशांचा गोडेबाजार वाढणार आहे.
महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याआधीच महायुतीकडे बहुमत असल्याचा दावा करुन कांग्रेस नेत्यांनी उमेदवारी दाखल करु नये यासाठी दबाव निर्माण केला होता. बावनकुळेंच्या मते त्यांच्या कडे 600 च्या आसपास मतदारांचे समर्थन आहे तर महाविकास आघाडीकडे आजच्या तारखेत 300 मतदार असुन या निवडणुकीत जातीय समीकरणाचे गणित महाविकास आघाडीकडुन आखले जात आहे. अतुल लोंढे व दिनेश ढोले हे दोन्ही कुणबी मराठा नेते आहेत. दोघांपैकी केवळ एक उमेदवार कांग्रेसकडुन ठेवला जाईल. यावेळी विधानपरिषदेचा मतदार हा सदसद्विवेकबुद्धी चा वापर करेल आणि महाविकास आघाडी संपुर्ण ताकद झोकुन भाजपला मोठा झटका देईल असा दावा कांग्रेसकडुन दावा व्यक्त केला जात आहे.
विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Vidhan Parishad Election 2026)
निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
अर्ज माघारीची मुदत- 4 जून
मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
मतमोजणी- 22 जून











