भाजपा उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांना विजयासाठी करावा लागेल मोठा संघर्ष?
नागपूर, दि. 2 जुन 2026
नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघातून महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी काल दि. 1 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत पाच उमेदवारांचे सहा नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले.
भाजप उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांचा नामांकन अर्ज दाखल करतांना

कांग्रेसचे अतुल लोंढे यांचा नामांकन अर्ज दाखल करतांना

कांग्रेसचे दिनेश ढोले यांचे नामांकन अर्ज दाखल करतांना

वंचित बहुजन आघाडी चे नगरसेवक राजेश जंगले यांचा (अपक्ष) अर्ज दाखल करतांना

अपक्ष उमेदवार सुरेंद्र लोही नामांकन अर्ज दाखल करतांना

भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांचे दोन अर्ज आहेत एक भाजपाचा तर दुसरा अपक्ष..भाजप कडुन उमेदवारी मिळेल की नाही याची कदाचीत शंका असल्याने कदाचित त्यांनी दोन नामांकन अर्ज दाखल केले असावेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरुवातीपासून विरोधकांवर मोठा दबाव बनवला होता की त्यांच्या कडे 600 मतदार आहेत त्यामुळे त्यांचा विजय सुनिश्चित आहे. विरोधकांकडे बहुमत नसल्याने त्यांनी ही निवडणुक बिनविरोध करावी असा त्यांचा प्रयत्न होता. परंतु निवडणुकीत एकुण 6 अर्ज आले त्यात भाजप उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांचा एक अपक्ष अर्ज ते मागे घेतील. तर कांग्रेसचे 2 अर्ज आले. एक अतुल लोंढे व दुसरा दिनेश ढोले यांचा नामांकन अर्ज. अतुल लोंढे यांचे नाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून आले आहे. ते देशातील शेतकरी, युवक, यांचे प्रश्न पक्षाचे प्रवक्ते म्हणून जोरदार पद्धतीने उचलतात. तर दिनेश ढोले हे माजी जिल्हा परिषद सदस्य असुन त्यांचे नाव पक्षाच्या एबी फार्म वर दुसऱ्या क्रमांकावर आहे. याचाच अर्थ अतुल लोंढे हेच अधिक्रृत उमेदवार असु शकतात असा एकीकडे दावा केला जातो. तर दुसरीकडे नामांकन अर्जाच्या छाननी वेळी जर लोंढेंचा अर्ज जर रद्द झाला तर केदार गटाकडून दिनेश ढोले यांचा अर्ज कांग्रेस पक्षाकडून ग्राह्य धरला जाईल. त्यामुळे कांग्रेसचे दोन उमेदवार अतुल लोंढे व दिनेश ढोले यांचे अर्ज काल दाखल झाले. यापैकी 4 जुन रोजी छाननीच्या वेळी या दोघांपैकी कुणाचा अर्ज ठेवला जातो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
काल जिल्हाधिकारी नागपुर कार्यालयात डॉ. राजीव पोतदार (भारतीय जनता पार्टी), वंचित बहुजन आघाडी चे नगरसेवक राजेश जंगले (अपक्ष), सुरेंद्र लोही (अपक्ष), दिनेश ढोले (इंडियन नॅशनल काँग्रेस), अतुल लोंढे (इंडियन नॅशनल काँग्रेस) या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.
नागपुर विधानपरिषद साठी भाजपला हा विजय आधी सोपा वाटत होता परंतु आता भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांची वाट बिकट झाली आहे. मागच्या वेळी भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना 360 मते घेण्यासाठी मोठी दमछाक करावी लागली. आज भाजप नेते जरी त्यांच्या कडे 600 नगरसेवकांचे समर्थन असल्याचा दावा करीत असले तरी यावेळी मोठय़ा प्रमाणात मतविभाजन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राजकीय वर्तुळात ही चर्चा होती की, मागच्या निवडणुकीत प्रत्येक नगरसेवकांस 2-2 लाख रुपये काही राजकीय पक्षांनी वाटले होते. यात काही तथ्य असेल असे आम्हाला वाटत नाही पण राजकारण आहे. राजकारणात आणि तेही विधानपरिषद, राज्यसभा निवडणुकीसाठी करोडो रुपयांचा वर्षाव मतदारांवर केला जातो हे खरे आहे. यावेळी ही निवडणुक बिनविरोध होत नसल्याने प्रत्येक नगरसेवकांत आनंदाचे वातावरण आहे कारण सध्या लक्ष्मीदर्शनाचा योग आहे . प्रत्येक नगरसेवकांस कमितकमी 10 लाख रुपये रेट मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत असुन राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगल सुरूआहेत. नागपुर विधानपरिषद निवडणुकीत करोडो रुपयांचा घोडेबाजार होणार. याकडे निवडणुक आयोग नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करणार हे मात्र खरे.
नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघ महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी 25 मे 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार दि. 1 जून होती. अर्जांची छाननी मंगळवार,दि. 2 जून रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख गुरूवार दि. 4 जून आहे. या पोटनिवडणुकीसाठी मतदान गुरूवार दि. 18 जून रोजी होत असून सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी सोमवार, दि. 22 जून रोजी करण्यात येईल.











