श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नवी दिल्ली : 7 जुन 2026.
इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात एकीकडे गैस सिलेंडर चा तुटवडा सुरु झाला तर दुसरीकडे दर 15-20 दिवसात पेट्रोल, व गैस सिलेंडर च्या दरात वाढ करीत मोदी सरकारने सर्वसामान्यांना जेरीस आणले. आज रवीवारी पुन्हा घरगुती गॅस सिलेंडर च्या किंमतीत मोठी वाढ करुन सामान्य नागरिकांस मोदी सरकारने जेरीस आणले. जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती कमी होत्या तेव्हा कधीच मोदी सरकारने गैस सिलेंडर च्या किंमती कमी केल्या नाहीत.. तर आता परत घरगुती गॅस महाग करुन ग्रृहिणींचे बजट मोदी सरकार ने बिघडवले आहे. विरोधी पक्षनेता खा. राहुल गांधी यांनी याआधीच इशारा दिला होता खि भारतीय अर्थव्यवस्था चे वाटोळे मोदी सरकारने केले.मित्र देश रशिया कडुन पेट्रोल गैस स्वस्त दरात भेटत असतांना अमेरिकेच्या दबावात येऊन मोदी सरकारने रशिया कडुन कच्चे तेल, पैट्रोल डिजल विकत घेणे बंद केले आणि अमेरिकेकडून तेल खरेदीचा दबाव असुन मोदी सरकार पेट्रोल गैस महागाई वाढवणार असा इशारा खा. राहुल गांधी यांनी याआधीच दिला होता.
घरगुती गैस सिलेंडर च्या किंमतीत 29 रुपयांची विलक्षण वाढ
सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केलीय. आता घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर वाढवण्यात आले आहेत. नव्या किंमती आजपासून लागू होणार आहेत. 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर 29 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत.
काही दिवसांपासून देशभरात दैनंदिन वापरातील आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना रविवारी केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला आणखी एक झटका दिला आहे. रविवारी सकाळपासून घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder Price) दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.
घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे मुंबईतील 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरचा दर 912.50 रुपयांवरुन 941.50 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. यापूर्वी 7 मार्चला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आता 29 रुपयांची दरवाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल व दैनंदिन वापरातील अन्य वस्तूंच्या महागाईमुळे सामान्य माणूस अगोदरच मेटाकुटीला आला असताना एलपीजी गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडणार आहे.










