महसुली नाल्याच्या खोलीकरणाच्या बांधावर शेतकऱ्यांचे स्विकारले महसुलमंत्र्यांना सिकारले निवेदन!
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी /नागपुर : 7 जुन 2026
पावसाळ्यापूर्वी जलनिस्सारण व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने कामठी तालुक्यातील गुमथळा येथे सुरू असलेल्या महसुली नाल्याच्या खोलीकरणाच्या कामाची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला..
पावसाळ्यात नाल्यातील पाणी शेजारील शेतजमिनीत शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची समस्या स्थानिक शेतकऱ्यांनी वारंवार मांडली होती. त्यानुसार महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील गुमथळा येथे महसुली नाल्याच्या खोलीकरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

या समस्येची गांभीर्याने दखल घेत प्रशासनामार्फत महसुली नाल्याचे खोलीकरण करण्यात आले आहे. या कामामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे होणार असून शेतजमिनींचे नुकसान टळण्यास मदत होणार आहे. तसेच परिसरातील जलव्यवस्थापन सुधारून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
पाहणीदरम्यान नाल्यालगतच्या परिसरातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसंदर्भातील निवेदने महसूल मंत्र्यांकडे सादर केली. बावनकुळे यांनी शेतकऱ्यांची निवेदने स्विकारून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्याशी चर्चा केली. संबंधित प्रश्नांवर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. महसुली नाल्याच्या खोलीकरणामुळे भविष्यात पावसाळ्यातील पाण्याचा निचरा सुरळीत होऊन शेतीचे नुकसान कमी होण्यास मदत होणार आहे.
यावेळी भाजप जिल्हा महामंत्री अनिल निधान,भवरी ग्रामपंचायतचे सरपंच ऋषी भेंडे, योगेश डाफ, चंद्रशेखर डाफ, महेश काकडे, पंकज राऊत, खुशाल डाफ, सुरेश रामटेके, सुनील डाफ यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











