श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
महादुला कोराडी /नागपुर : 5 जुन 2026.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज महादुला शहरात ठिकठिकाणी व्रृक्षारोपण करण्यात आले. आज दि. 05 जून 2026 रोजी जागतिक नगर पंचायत महादुलाचे मुख्याधिकारी गणेश जगदाळे यांचे मार्गदर्शनात नगर पंचायत महादुला द्वारे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


यावेळी नगर पंचायत महादुलाच्या नगराध्यक्षा हेमलता सावजी ठाकुर , कोराडी ग्रामपंचायत चे माजी सरपंच नरेंद्र धानोले,गटनेता अभिजीत ढेंगरे, नगरसेवक राजकुमार उईके, प्रितम लोहसारवा, मोहसीन शेख, अजय सोलंकी, नगरसेविका स्वाती लांडे, सोनु उघडे, संध्या साबळे, माजी नगरसेवक पवन पखिड्डे, स्वप्निल थोटे, भाजपा शहर अध्यक्ष सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते मनोज सावजी , मोंटु कुथे,मनिष मेश्राम,जितेश भगत,अनिल बोरकर,अंकित तुरक,हनुमंता लशकरे,बापुराव सोनवणे, मनोज वाकले, शुभम मोहिते (स्वच्छता विभाग) , कर्मचारी अमोल पखिड्डे, सोनु गजभार राहुल कांबळे,आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी सर्व उपस्थितांना हरित शपथ व स्वच्छता शपथ देण्यात आली. तसेच सर्व उपस्थितांना पर्यावरनाचे रक्षण करण्याकरिता एक पेड मां के नाम या उपक्रमा अंतर्गत जास्तीत जास्त झाडे लावण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे आहेत. ते आपल्याला ऑक्सिजन प्रदान करतात, हवेतील विषारी वायु दूर करतात, पाण्याचे संवर्धन करतात, वन्यजीवांना आधार देतात आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यास मदत करतात. आज वृक्ष लावणे हा आरोग्यदायी आणि हिरव्यागार भविष्याच्या दृष्टीने एक गुंतवणूक आहे.पर्यावरण दिन निमित्या सर्वानी शपथ घेऊ की, निसर्गाचे संरक्षण करणे ही आपली सामायिक जबाबदारी आहे. आपण लावलेला प्रत्येक वृक्ष स्वच्छ पर्यावरण आणि भावी पिढ्यांसाठी श्रेष्ठ जीवनगुणवत्तेत योगदान देतो.चला आपण फक्त वृक्ष लावण्याचे नाही तर त्यांची काळजी घेण्याचे आणि इतरांनाही तसे करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे वचन देऊ. एकत्र येऊन आपण आपले शहर हिरवे, निरोगी आणि सुंदर बनवू शकतो.” अशी शपथ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देण्यात आली.










