नागपुरातील भाजप नगरसेवक स्वखर्चाने प्रशिक्षणासाठी जात असल्याचा महसुलमंत्री बावनकुळेंचा दावा
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 9 जुन 2026
सुत्राकडुन मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भाजप नेत्यांकडे बहुमताचे कितीही आकडे असले तरी आपले नगरसेवक फुटु नये यासाठी भाजप नेत्यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना गोवा पर्यटनवारीवर पाठवण्याचे ठरविले आहे. एकीकडे भाजप नेते एकुण 834 मतांपैकी त्यांच्या कडे 581 मते असल्याचा दावा जरी करीत असले तरी आपले नगरसेवक फुटु नये यासाठी भाजप नेते कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाही.
नागपुर विधानपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ.राजीव पोतदार व कांग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात आमनेसामने लढाई होणार आहे. संभाव्य पक्षांतर आणि विरोधी पक्षांकडून होणाऱ्या मत व्यवस्थापनाच्या प्रयत्नांच्या चिंतेमुळे, भाजपने मतदानाच्या दिवसापर्यंत आपल्या नगरसेवकांना गोव्यात एकत्र ठेवण्यासाठी एक विस्तृत रणनीती आखली आहे.
भाजपने आपल्या लोकप्रतिनिधींना प्रभावीपणे सुरक्षित ठेवण्यासाठी, गोव्यातील रिसॉर्टमधील मुक्काम आणि प्रशिक्षण सत्रांचा समावेश असलेला एक आठवडाभराचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
नागपूर महानगरपालिकेतील नगरसेवकांचे गोव्यात ‘पर्यटन’ किंवा राजकीय सहलीवर जाणे हा प्रकार प्रामुख्याने राजकीय पक्षांतर्गत निवडणुका (उदा. एमएलसी/स्थानिक स्वराज्य संस्था) किंवा सत्ता समीकरणांच्या काळात घडतो. क्रॉस-व्होटिंग टाळण्यासाठी आणि पक्षातील नगरसेवकांना एकत्र ठेवण्यासाठी (Resort Politics) राजकीय पक्षांकडून अशा सहलींचे आयोजन केले जाते.
भाजपचे नगरसेवक 10 जून रोजी दुरंतो एक्सप्रेसने नागपूरहून मुंबईसाठी निघतील आणि दुसऱ्या दिवशी विमानाने गोव्याला जातील. ते 14 जून रोजी मुंबईला परतण्यापूर्वी या किनारपट्टीच्या राज्यात तीन दिवस मुक्काम करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी सांगितले की, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत स्वागत कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका स्नेहभोजन कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि त्यानंतर 15 व 16 जून रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे होणाऱ्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी होतील. पक्षात एकजूट टिकवून ठेवण्यासाठी नगरसेवकांच्या निवासाची सोय करण्याचा विचारही पक्षश्रेष्ठी करत आहेत. मात्र, महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांना या दौऱ्याच्या कार्यक्रमातून वगळण्यात आले आहे.
निवडणुकीच्या आधीच्या दिवसांमध्ये विरोधी पक्ष मतदानाच्या पद्धतीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतील अशी चिंता आहे आणि पक्षांतर किंवा क्रॉस-व्होटिंगची शक्यता टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून नगरसेवकांना सुरक्षित ठेवले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेवकांची विभागनिहाय गटांमध्ये विभागणी करुन प्रत्येक गटाची जबाबदारी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर सोपवली जाईल. संख्याबळ जास्त असूनही, पक्षाला ही निवडणूक अत्यंत राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. पुरुष आणि महिला नगरसेवकांसाठी स्वतंत्र निवासव्यवस्था केली जात आहे.
महिला नगरसेवकांसह पतीही गोवा पिकनिकला जाण्यासाठी आग्रही?
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुर ग्रामीण व शहरातील भाजप च्या पहिल्यांदा निवडुन आलेल्या महिला नगरसेविका एकट्या गोव्याला जाण्यास तयार नसुन त्या त्यांचेसोबत त्यांचे पतीदेवांना ही नेण्यासाठी आग्रही आहेत. मुळात महिला नगरसेविका पेक्षा हा आग्रह त्यांच्या पतीदेवांना आहे.निवडणुकीच्या निमित्ताने गोवा पिकनिक चा आस्वाद भेटेल याकरिता पतीदेव आग्रही आहेत. त्यामुळे भाजप महिला नगरसेविकेसोबत आता त्यांच्या पतीदेवांना ही गोवा पिकनिक वारीवर नेणे भाजप नेत्यांना आर्थिकदृष्ट्या जड जाऊ शकते.
कांग्रेसचे उमेदवार फुटले? भाजप उमेदवार राजीव पोतदार यांच्या प्रचार सभेत कांग्रेसच्या महिला नगरसेविकेची उपस्थिती

महादुला नगरपंचायत मधील कांग्रेसच्या एक महिला नगरसेवक ह्या भाजप नगरसेवकांसह कामठीकन्हान येथील भाजप उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांच्या गोपनीय प्रचार बैठकीत उपस्थित असल्याची चर्चा आहे महादुला नगरपंचायत च्या कांग्रेस नगरसेविका प्रतिभा तिलक गजभिये यांचा फोटो सोशल मीडिया वर वायरल झाला. भाजप नगरसेवकांसह त्या ही डॉ. राजीव पोतदार यांचे स्वागत करतांना या वायरल फोटोत दिसत असल्याने कांग्रेसचे किती नगरसेवक फुटले आणि किती नगरसेवक पडद्याआडून भाजप उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांना मतदान करणार हा कांग्रेस साठी चिंतेचा विषय आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचेशी जवळीक असल्याने कांग्रेसचे तिलक गजभिये यांच्या पत्नी भाजप नगरसेवकांसह त्या बैठकीत गेल्या. आता त्या राजीव पोतदार यांना मतदान करणार की नाही हे तर लवकरच कळेल परंतु यासाठी भाजप कडुन काही पैशांची आँफर कांग्रेसच्या नगरसेवकांना दिली तर जात नसेल असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
कांग्रेस अंतर्गत होत असलेल्या गटबाजी व फुटीचा फटका कांग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांना बसण्याची दाट शक्यता आहे.

नागपूर ग्रामीण क्षेत्रातील पक्षांचे संख्याबळ: भाजप (BJP): 117 नगरसेवक शिवसेना (शिंदे गट): 53 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस (NCP): 37 नगरसेवक
असुन नागपुर मनपा मध्ये 151 पैकी 102 भाजप नगरसेवक आहेत. तर नागपुर ग्रामीण मध्ये कांग्रेस आघाडीकडे जवळपास 250 नगरसेवक असुन नागपुर मनपा मध्ये 30 नगरसेवक आहेत. कांग्रेस कडे 280 चा आकडा आहे तर भाजप महायुतीकडे एकुण ग्रामीण मध्ये 440 नगरसेवकांचा आकडा आहे.मनोनित नगरसेवक नागपुर ग्रामीण मध्ये 104 च्या आसपास आहे.
एकंदरीत 834 मतदारांपैकी 500 च्या आसपास भाजपकडे वोटबैंक आहे तर काँग्रेस कडे एकुण 300 मतदार आहेत. राजकीय तुल्यबळ बघता भाजप कडे एकुण आघाडी 200 च्या वर आहे तरी भाजपला आपले नगरसेवक फुटु नये ही भीती वाटते तर कांग्रेसकडे गमवायला काही नाही. यावेळी ही निवडणुक ईव्हीएम वर न होता बैलेटपेपरवर होणार आहे. त्यामुळे कांग्रेसच्या नेत्यांना वाटते की भाजप चे नगरसेवक हे कांग्रेस चे नगरसेवक अतुल लोंढे यांना गुप्त पद्धतीने सदसद्विवेकबुद्धी चा वापर करीत गुप्त मतदान करतील असा दावा कांग्रेसचे नेते करतात. कांग्रेसचे आ.विकास ठाकरे तर पुढे हे म्हणाले की कांग्रेस चे उमेदवार अतुल लोंढे हे 100 च्या वर मताधिक्य घेऊन विजयी होतील आता कांग्रेसचे आ. विकास ठाकरे यांनी हा दावा केल्यानंतर भाजप गोटात फोडाफोडीचे राजकारण तर होणार नाही याची चिंता लागली आहे म्हणुनच पिकनिक पाँलिसी वापरत भाजप नेते कोणताही दगाफटका नागपुर विधानपरिषद निवडणुकीत होऊ नये म्हणून आपल्या नगरसेवकांना गोवा पिकनिक ला पाठवत आहे.
इतर काही राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी भाजपच्या नगराध्यक्षास ठिकठिकाणी पाठिंबा दिल्याने नागपुर विधानपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांचे पारडे जड झाले आहे. वरवर बघता बहुमतांचा आकडा हा भाजप उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांच्या बाजुने असुन कांग्रेस नंबर गेममध्ये खुप मागे आहे. दुसरीकडे कांग्रेसकडे नागपुर ग्रामीण भागात फुटाफुटीचे वातावरण दिसत आहे.
भाजप नगरसेवक स्वखर्चाने प्रशिक्षणासाठी जात आहेत-महसुलमंत्री बावनकुळे

राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय व प्रशासकीय विषयांवर भूमिका स्पष्ट केले, ही भाजपमधील आदर्श परंपरा आहे.
भाजपच्या नगरसेवकांच्या प्रशिक्षण दौऱ्याबाबत बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, नागपूर शहर व जिल्ह्यातील सर्व नगरसेवक स्वतःच्या खर्चाने प्रशिक्षणासाठी जात आहेत. काही जण पर्यटनासाठीही जात असले तरी त्यांनी पक्षाकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता स्वखर्चाने जाण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाजपमधील आदर्श परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले.











