836 मतदार 14 मतदान केंद्रांवर बजावणार आज मतदानाचा हक्क!
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपूर :18 जुन 2026
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघ पोटनिवडणुकीचे मतदान 18 जून 2026 रोजी होत आहे. भाजपने यावेळी जुने निष्ठावंत नेते डॉ. राजीव पोतदार यांना मैदानात उतरवले तर महाविकास आघाडीने आपली संपुर्ण ताकद कांग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यामागे आपली संपुर्ण ताकद झोकली आहे. निवडणुकीच्या आधीपासून भाजप नेते महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर आपला दबाव बनवत त्यांच्या कडे 581 मते असल्याचा दावा केला. निवडणुकीत मतदानाच्या आकडेवारीत मागे असतांना ही महाविकास आघाडीने भाजप ला घाम फोडला. भाजपकडे एवढे बहुमत आहे तर स्वतःच्या नगरसेवकांचे मोबाईल जप्त करुन त्यांना गोव्याला पिकनिक साठी का पाठवले? असा टोमणा कांग्रेसचे शहर अध्यक्ष प्रफुल गुडधे पाटील यांनी भाजप ला लावला. तर काँग्रेस आ. विकास ठाकरे यांनी तर मोठा दावा करीत सांगितले की कांग्रेसचे अतुल लोंढे हे 100 मतांनी निवडून येतील. भाजप ला त्यांची मते फुटण्याची भीती या निवडणुकीत दिसली.अशावेळी कांग्रेस महाविकास आघाडीने ओबीसी कार्ड खेळले. पहिल्यांदाच महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते माजी ग्रृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, खासदार शामकुमार बर्वे यांनी ओबीसी जनगणना भाजपच्या मोदी सरकारने कशी रोखली? जनगणनेमध्ये ओबीसी चा स्वतंत्र काँलम नसल्याने ओबीसींना त्यांचे आरक्षण लोकसंख्येच्या आधारावर भाजप ने कशा पद्धतीने संपविण्याचा घाट घातला यांवर भाजप हा घेरले. आम्ही आकड्यांच्या खेळात मागे असलो तरी भाजप महायुतीतील कित्येक ओबीसी मतदार हे नाराज असुन ते आमच्या बाजुने मतदान करतील. नागपुर विधानपरिषद निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना डावल्याने ओबीसी मतदार हा कांग्रेस चे अतुल लोंढे यांनाच मतदान करेल असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. आज नागपुर विधानपरिषद निवडणुक असुन मतदानासाठी निवडणूक विभागातर्फे पूर्ण सज्जतेने तयारी करण्यात आली आहे. 18 महिन्याचा कालावधीसाठी होऊ घातलेल्या या निवडणुकीत नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानपरिषद सीट डॉ. राजीव पोतदार हे राखतात कि कांग्रेसचे अतुल लोंढे हे भाजपा कडुन ही सीट आपल्या कडे ओढुन आणतात? याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे. यावेळी पहिल्यांदा च बैलेटपेपरवर ही निवडणुक होणार आहे. ईव्हीएम चा वापर होणार नसल्याने ईव्हीएम मध्ये घोटाळे करुन विजय मिळविण्याचा भाजप डाग पुसणार आहे.
नागपुरात जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी कंबर कसली
नागपुर जिल्ह्यात कुठेही या निवडणुकीच्या अनुषंगाने अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
नागपुर विधानपरिषद निवडणुकीसाठी एकुण 14 मतदार केंद्र
नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी 836 मतदार असून यात 419 पुरुष मतदार तर 417 महिला मतदार आहेत. मतदानासाठी एकूण 14 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे.
नरखेड तहसील कार्यालय येथे नरखेड व मोवाड नगरपरिषेच्या मतदारांना मतदान करता येईल.
काटोल तहसील कार्यालय येथे काटोल नगरपरिषद व कोंढाळी नगरपंचायतच्या मतदारांना मतदान करता येईल.
कळमेश्वर तहसील कार्यालय येथे कळमेश्वर-ब्राम्हणी नगरपरिषद व मोहपा नगरपरिषदेच्या मतदारांना मतदान करता येईल.
सावनेर तहसील कार्यालय येथे सावनेर नगरपरिषद व खापा नगरपरिषदच्या मतदारांना मतदान करता येईल.
पारसिवनी तहसील कार्यालय येथे पारशिवनी नगरपंचायतच्या मतदारांना मतदान करता येईल.
नगरपरिषद कन्हान पिंपरी येथे नगरपरिषद कन्हान पिंपरी व नगर पंचायत कांद्री येथील मतदारांना मतदान करता येईल.
रामटेक तहसील कार्यालय येथे रामटेक नगरपरिषदेच्या मतदारांना मतदान करता येईल. मौदा तहसील कार्यालय येथे मौदा नगर पंचायतच्या मतदारांना मतदान करता येईल.
कामठी तहसील कार्यालय येथे कामठी नगरपरिषद, महादुला नगर पंचायत, येरखेडा नगर पंचायत, बीडगाव नगर पंचायत, गोधणी नगर पंचायत, बहादुरा येरखेडा नगर पंचायत, कान्टोनमेंट बोर्ड कामठी येथील मतदारांना मतदान करता येईल.
नागपूर शहर तहसील कार्यालय येथे महानगरपालिकेच्या मतदारांना मतदान करता येईल.
नगरपरिषद वानाडोंगरी येथे वानाडोंगरी व वाडी नगरपरिषद, निलडोह नगरपंचायत, डिंगडोह नगरपरिषद आणि हिंगणा नगर पंचायतच्या मतदारांना मतदान करता येईल.
बुटीबोरी नगरपरिषद येथे बुटीबोरी व नगर पंचायत बेसा-पिंपळाच्या मतदारांना मतदान करता येईल.
उमरेड तहसील कार्यालय येथे उमरेड नगर परिषद, नगरपंचायत कुही, नगरपंचायत भिवापूर येथील मतदारांना मतदान करता येईल. या 14 मतदान केंद्रावर एकूण 836 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. या पोटनिवडणुकीसाठी मतदान गुरूवार 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत होणार आहे. मतपेटयासाठी बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे स्ट्रॉंग रुम तयार करण्यात आली आहे. याच ठिकाणी सोमवार दिनांक 22 जून रोजी मतमोजणी होईल.












