सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
महादुला नगरपंचायत /नागपुर : 17 जुन 2026
नागपूर जिल्ह्य़ातील महादुला नगरपंचायत येथील दैनंदिन व आठवडी बाजार चिठ्ठी वसुलीचा ठेका 31 मार्च 2026 ला संपल्यानंतर या बाजारात चिठ्ठीवसुली नगरपंचायत चे आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करणे आवश्यक असतांना ही नगरपंचायत प्रशासनाने ही चिठ्ठीवसुली केली नाही. आठवडी बाजारात चिठ्ठी वसुली करणाऱ्या जुन्या ठेकेदाराने मागील अडीच महिने स्वतः अवैध वसुली केली तसेच जुन्या ठेकेदारास महादुला नगरपंचायत ने ठरवुन दिलेल्या रेट प्रमाणे बाजार वसुली करणे बंधनकारक होते तरीही जुन्या ठेकेदाराने प्रति 100/- रुपये चिठ्ठी तसेच लाईट चे 100/- रुपये अशी बिनाचिठ्ठी वसुली केली त्यामुळे येथील महात्मा फुले बाजार समिती चे छोटे भाजीपाला विक्रेता त्रस्त झाले आहेत.
बिना पावती बाजारात अवैध वसुली खंडणीचा गुन्हा होऊ शकतो कंत्राटदारावर दाखल
मिळालेल्या माहितीनुसार या बाजारात अवैध रित्या बिना चिठ्ठी दुकानदाराकडून वसुली केली जाते. विनापावती सक्तीने पैसे वसूल करणे, धमकावणे हा खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा ठरू शकतो.जर कंत्राटदाराचे गुंड दुकाने लावू न देण्याची धमकी देत असतील, तर तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करता येते.
आता ज्या ठेकेदारांने या बाजार वसुलीची बोली 11 लाखावर लावली त्या ठेकेदारांने जुन्याच ठेकेदारास पेटी मध्ये चिठ्ठीवसुली चे काम दिले असुन तो जुना ठेकेदार आता मनमानी पद्धतीने प्रति दुकानदार 120/-/- रुपये चिठ्ठी व लाईट चे 110/- रुपये घेत असल्याची तक्रार एका प्रेसनोट च्या माध्यमातून फुटपाथ भाजीपाला विक्रेता, व दुकानदार यांनी केली आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष हेमलता मनोज सावजी तसेच मुख्याधिकारी तसेच तहसीलदार गणेश जगदाळे यांनी संबधित कंत्राटदार यांचेवर कारवाई करावी, तसेच जुन्या कंत्राटदार याची दादागिरी ची भाषा यामुळे त्रस्त झालेल्या दुकानदारास न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
महादुला नगरपंचायत त्यांच्या टेंडर मध्ये असे रेट ठरवले आहे.

तर लाईटसाठी हे दर निश्चित केले

असे असतांना महादुला बाजारात बिना चिठ्ठी अवैध वसुली अद्याप कंत्राटदार यांचे माध्यमातून सुरु असुन चिठ्ठी मागितल्यास त्यांना जुना ठेकेदार हा शिवीगाळ व धमक्या देतो अशी या पीडित दुकानदार यांची तक्रार असुन त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण संबंधित ठेकेदार करीत असुन त्याची चौकशी करा त्याला ब्लैकलिस्ट करा अशी मागणी महात्मा फुले बाजार समितीचे पदाधिकारी मंगलाताई वाहाणे, रकमाताई मोहनकर, रवी सुर्यवंशी, अंजुमताई खान, जिनाताई गजभिये, विष्णू अडकणे, रेखाताई पाल, योगराज रंगारी, गोपाल बेंदेवर, क्रृष्णा दहिलिंगे, रजत खोब्रागडे, मंगेश भेलावे, नीळकंठ राऊत व इतर पदाधिकारी यांनी एका निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नागपुर चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तथा मुख्याधिकारी महादुला नगरपंचायत यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.













