श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कळमेश्वर /नागपुर 18 जुन 2026.
काल 17 जून 2026 रोजी रात्री सुमारे 12 वाजताच्या दरम्यान कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील भरतवाडा येथील रेल्वे पटरीजवळ एका इसमाचा रेल्वे अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली. माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस स्टेशनचे सुनील मिश्रा, पोलीस डहाके, पोलीस राम नेहारे तसेच सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मंगेश गमे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
सदर इसमाचा मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथे आणण्यात आला.


तपासादरम्यान मृत व्यक्तीची ओळख लक्ष्मीकांत सुरज जामदार (वय 28 वर्षे), रा. कोराडी अशी पटली.
घटनेची नोंद घेऊन पुढील तपास कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील मिश्रा करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण व इतर बाबींचा तपास सुरू असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.












