श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
मानवत/परभणी: 20 जुन 2026.
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळुन 5 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली 30 ते 40 भाविक अडकल्याचे समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे..
मानवत येथील यशवाडी येथील हनुमान मंदिर हे जागृत देवस्थान असल्याची अख्यायिका आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यातून दर शनिवारी लाखो भाविक येत असतात. सकाळपासूनच भाविकांची मंदिरात मोठी गर्दी होती. मुख्य मंदिरासमोरील सभागृहात दर्शन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन सुरू होते. शेकडो भाविक या सभागृहात उपस्थित असतानाच अचानक दुपारी सभागृहाचे छत कोसळले. छत कोसळल्याचा मोठा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.
सभामंडपात काही भाविक हनुमान मंदिरासमोर हात जोडून उभे होते. त्यावेळी परिसरात सुरू असलेल्या सभा मंडपाच्या बांधकामाचा एक मोठा भाग अचानक पत्त्यासारखा कोसळला. पिलर आणि छताचा राडारोडा थेट खाली उपस्थित असलेल्या भाविकांवर पडला. या राडारोड्यात अनेक भाविक दबले गेले. अचानक छत कोसळल्यानं भाविकांना बाहेर पडता आले नाही.प्रशासनाकडून तत्काळ बचावकार्य सुरु करण्यात आली आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सर्व यंत्रणा पाठवली घटनास्थळी पाठवली. अनेक अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यासाठी अँम्ब्युलन्सची धावपळ सुरू होती. घटनास्थळी सतत घुमणारे सायरन, नातेवाईकांचा आक्रोश आणि जखमींच्या वेदनादायी किंकाळ्या यामुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्यात येत आहे.












