डॉ. राजीव पोतदार यांच्या विजयाचे मोठे श्रेय नागपुर चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना
श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर :22 जुन 2026 .
नागपुर विधानपरिषद निवडणुकीअगोदर भाजपने आकड्यांच्या खेळात आधीच बाजी मारली होती. तसा राजकीय दबाव भाजप नेत्यांनी विरोधकांवर आणला होता. 18 जुन रोजी पार पडलेल्या या विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी अपेक्षापेक्षा जास्त मते घेऊन दणदणीत विजय मिळविला असल्याची मोठी बातमी पुढे येत आहे. भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी याआधीच साडे सहाशे पेक्षा जास्त मते घेऊन आपला प्रचंड महाविजय होईल असा दावा केला होता.
आज झालेल्या मतमोजणीनुसार एकुण झालेल्या 823 मतांपैकी भाजपचे डॉ.राजीव पोतदार यांना 682 मते मिळाली तर कांग्रेस महायुतीचे उमेदवार अतुल लोंढे यांना फक्त 130 मते मिळाली.महायुतीचे डॉ. राजीव पोतदार यांनी कांग्रेसचे अतुल लोंढे यांचा दारुण पराभव केला.
भाजपकडे संख्याबळ असतांना ही कांग्रेस ने बिनविरोध निवडणुक होऊ दिली नाही. कांग्रेसचा या निवडणुकीत पराभव अटळ असतांना या निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी कांग्रेसचा एकही मातब्बर नेता मैदानात उतरला नाही. बळीचा बकरा बनविण्यासाठी कांगेस नेत्यांनी कांग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे त्यांना उमेदवारी दिली होती. पराभवाची नामुष्की ओढाऊ नये म्हणून कांग्रेसचे नेत्यांनी हा सुरक्षात्मक बचावाचा पावित्रा घेतला.
भाजप उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांच्या विजयाचे खरे शिल्पकार चंद्रशेखर बावनकुळे

नागपुर चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. राजीव पोतदार यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले. पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अख्या नागपुर जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका मधील सर्व भाजप नगरसेवक यांची एकजुट केली त्यांच्या सातत्याने बैठका घेत आपली संगठनेवर किती पकड आहे हे दाखवुन दिले. नागपुर जिल्ह्यातील विविध नगरपरिषद नगरपालिकेत अधिकांश नगरसेवक निवडुन आणण्यात बावनकुळेंचा सिंहाचा वाटा आहे. बावनकुळे यांनी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांना सुद्धा हाताशी धरित रिसोर्ट पालिटिक्स चा आधार घेत सर्व नगरसेवकांना नागपुर बाहेर पाठवले. मुंबई, गोवा, काश्मीर, उज्जैन, ला पाठविता नगरसेवकांना एकत्र ठेवत क्रासवोटिंग रोखली. भाजप महायुती चा एकही नगरसेवक फुटला नाही परंतु कांग्रेस महाविकास आघाडीचे जवळपास जवळपास 100 च्या आसपास मते आपल्याकडे खेचली. भाजप चे उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांच्या विजयाचे खरे शिल्पकार हे महसुलमंत्री तथा नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेच आहेत असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही.
एकंदरीत बावनकुळे यांची विधानपरिषद सीट डॉ. राजीव पोतदार यांनी राखली. कांग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांच्यापेक्षा 5 पट मते जास्त घेत डॉ. राजीव पोतदार ह्यांनी हा महाविजय मिळवित मागच्या विधानपरिषद निवडणूकीतील भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा ही रेकार्ड ब्रेक केला. प्रचंड मताधिक्य घेत डॉ. राजीव पोतदार हे या निवडणुकीत विजयी झाले आहेत.















