श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर: 23 जुन 2026
नागपुर दिवसेंदिवस क्राईम सिटी बनत चालली होती. देशात अपराधांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांवर अंकुश लावण्यात नागपुर चे पोलीस खाते अपयशी ठरले की काय? अशी चर्चा विरोधक करीत असतांनाच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वारंवार नागपुर सुरक्षित नसल्याचा वारंवार आरोप केला होता. अशातच नागपुर चे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंघल यांची तडकाफडकी बदली चा आदेश आज निघाला.

नागपुर चे नवे पोलीस आयुक्त विश्वास नागरे !

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक असलेले विश्वास नागरे यांची नियुक्ती करण्याचे शासन आदेश आज काढण्यात आले. तर पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांची बदली विश्वास नागरे यांच्या अप्पर पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या ठिकाणी करण्यात आली आहे.
नागपुर चे नवे पोलीस आयुक्त विश्वास नागरे यांच्यापुढे अपराधमुक्त नागपुर शहर करणे मोठे आव्हान?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ग्रृहशहर असलेल्या नागपुरात वाढलेले गुन्हे, मर्डर च्या सातत्याने वाढलेल्या घटनेमुळे नागपुर कैपिटल क्राईम सिटी बनु नये हे मोठे आव्हान आता नागपूर चे नवे पोलीस आयुक्त विश्वास नागरे यांच्यापुढे आहे. गुन्हेगारांवर अंकुश लावण्यासाठी नवीन उपाययोजना आवश्यक आहे त्यादृष्टीने कडक अंमलबजावणी करावी लागेल. प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारु, अंमली पदार्थ तस्करी, अवैध सट्टापट्टी यांवर अंकुश लावणे ही काळाची गरज आहे. एवढ्यर मोठ्या प्रमाणात नागपुरात एम डी, गांजा सारखे अंमली पदार्थ येतातच कसे? गुन्हेगारांची उत्पत्ती याच अवैध व्यवसायातुन वाढत चालली आहे. ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारूविक्री व सट्टापट्टी सुरु असेल त्या पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना जबाबदार धरुन त्यांचेवर तडकाफडकी निलंबित करण्यासाठी कठोर पावले नवे नवे पोलीस आयुक्त विश्वास नागरे यांनी उचलण्याची मोठी गरज आहे.
RTI मधुन प्राप्त नागपुरातील गुन्हेगारी आकडे चिंताजनक!
नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून माहितीच्या अधिकार (RTI) अंतर्गत प्राप्त झालेल्या आकडेवारीतून शहरातील गुन्हेगारीचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या कार्यकाळात 2024 ते एप्रिल 2026 या कालावधीत हत्या, खुनाचा प्रयत्न, अपहरण, बलात्कार, घरफोडी, चोरी, खंडणी आणि दरोडा अशा गंभीर स्वरूपाच्या तब्बल 10,953 गुन्ह्यांची नोंद झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाले आहे.
आरटीआय अंतर्गत नागपूर पोलीसांच्या गुन्हे शाखेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या कालावधीत 199 हत्या, 390 खुनाचे प्रयत्न, 1,236 अपहरण, 549 बलात्कार, 2,288 घरफोड्या, 6,113 चोरी,179 ऍट्रॉसिटी,148 खंडणी आणि 30 दरोड्यांचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे वर्ष 2024 मध्ये 83 हत्या, 2025 मध्ये 91 हत्या, तर 2026 च्या एप्रिलपर्यंत 25 हत्या अश्या 199 हत्या झाल्याची नोंद आहे. त्यामुळे शहरातील गंभीर गुन्ह्यांच्या नियंत्रणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.या हत्येने नागपूर शहराचे नाव देशात दोन नंबर आले आहे.
MD, गांजा या मादक पदार्थांच्या गुन्ह्यांत मोठी वाढ!
आरटीआय मधील माहितीनुसार, NDPS कायद्यांतर्गत 2024 मध्ये 272 गुन्हे नोंदविण्यात आले होते. 2025 मध्ये ही संख्या वाढून 601 वर पोहोचली. जानेवारी ते एप्रिल 2026 या कालावधीत 123 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. झोन-6 हा सर्वाधिक संवेदनशील ठरला असून 2025 मध्ये येथे 187 गुन्हे नोंदविण्यात आले.












