श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 2 जूलै 2026.
नागपूरमधील सिव्हिल लाइन्स परिसरातील प्रसिद्ध हॉटेल हेरिटेज (Hotel Heritage) येथे सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांनी 1 जुलै 2026 च्या मध्यरात्री मोठी धाड टाकली आहे.

नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एनडीपीएस (अमली पदार्थ विरोधी) पथकाने एका गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली आहे. बुधवारी (1 जुलै) मध्यरात्री सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध ‘हॉटेल हेरिटेज’ येथे सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर धडक कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी 36 पुरुष, 9 महिला, हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 49 जणांना ताब्यात घेतले आहे. या धडक कारवाईमुळे शहरात अवैध व्यवसाय चालवणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Squad) ही धडक कारवाई केली असून या छाप्याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
मुख्य कारवाई आणि अटक 45 जण ताब्यात
हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर हुक्का ओढताना आढळलेल्या 36 पुरुष आणि 9 महिलांना पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले. यामध्ये अनेक महाविद्यालयीन तरुणींचाही समावेश आहे.
हॉटेल हेरिटेजमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालवले जात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल यांना मिळाली होती. माहितीची खात्री करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी आधी स्वतः हॉटेलमध्ये जाऊन परिस्थितीची रेकॉर्ड केली.
पोलिसांनी हॉटेल मालक गुरप्रीत सिंग खंडूजा, हॉटेल मॅनेजर संजय चिंचखेडे आणि तिथे कार्यरत असलेले वेटर यांच्यासह उपस्थित ग्राहकांवर कायदेशीर कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 23 हजार रुपये किमतीचे 13 हुक्का पॉट्स आणि हुक्का ओढण्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त केले. या संपूर्ण मोहिमेत वेगवेगळ्या कारवाई दरम्यान एकूण 3 लाख 57 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी नवीन भारतीय न्याय संहिता (BNS कलम 272) आणि कोटपा (COTPA) कायद्याच्या कलम 4, 6, 7, 20, 21 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.तिथे अंमली पदार्थांचा (Drugs) वापर केला जात होता का, हे तपासण्यासाठी पोलिसांच्या ट्रॅफिक ब्रँचकडून अँटी-ड्रग्ज टेस्ट किट मागवून सॅम्पल्स गोळा करण्यात आले असून पुढील कारवाई फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे केली जाईल.
नागपुर शहर पोलीस अंतर्गत नागपुर सावनेर महामार्गालगतच्या काही हाँटेल बार मध्ये मागील काही वर्षांपासून अवैध हुक्कापार्लर राजकीय वरदहस्त लाभल्याने सुरु असल्याची चर्चा आहे.नागपुरहुन कित्येक शौकीन हुक्का मारण्याचा आनंद घेण्यासाठी या हाँटेल मध्ये येत असतात. याकडेही आता नागपुरचे नवे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.












