श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 5 जुलै 2026.
ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि विदर्भातील सहकार व शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बाबुरावजी तिडके यांचे वयाच्या 85 व्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे नागपूर येथे निधन झाले.शिक्षण महर्षी बाबुरावजी तिडके हे मौदा नगरपंचायत चे राजाभाऊ (प्रसन्ना) तिडके-(भाजपा) यांचे वडील होते. बाबुरावजी तिडके ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि सहकार चळवळ बळकट करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.अधिकृत वृत्तानुसार, त्यांच्या निधनामुळे सार्वजनिक जीवनातून एक दूरदृष्टी असलेला नेता हरपला असून, त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे.

काँग्रेस जेष्ठ नेते तथा श्रीराम ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्षबाबुराव तिडके त्यांचे पार्थिव हिंदुस्तान कॉलनी अमरावती रोड, नागपुर येथे दुपारी 12.30 वा अंतिम दर्शना करिता ठेवण्यात आले असुन दुपारी 2 वाजता नागपूर येथून रवाना होऊन सायंकाळी 4 वाजता मौदा येथील त्यांच्या शिक्षण संस्थेच्या परिसरात अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मौदा नगरपंचायत चे नगराध्यक्ष राजाभाऊ (प्रसन्ना) तिडके यांच्या मित्रपरिवाराने दिली आहे.
मोलाचे योगदान देणारे बाबुराव मारोतराव तिडके हे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते. त्यांनी विदर्भातील ग्रामीण आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करून दिली. त्यांनी नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे शैक्षणिक संस्थांची स्थापना केली, ज्या आजही कार्यरत आहेत. नागपुरातील मौदा सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे उघडली त्यामुळे त्यांना शिक्षण महर्षी सुद्धा ओळखले जाते. त्यांच्या कार्याबद्दलची मुख्य माहिती खालीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक कार्य:
त्यांनी 1990 मध्ये ‘श्रीराम ग्राम विकास शिक्षण संस्था, नागपूर’ अंतर्गत श्रीमती राजकमल बाबुराव तिडके महाविद्यालय, मौदा, महाराष्ट्र ची स्थापना केले.
ग्रामीण विकास:
मौदा हा तहसील आणि ग्रामीण भाग असल्याने, तेथील शेतकरी आणि कामगारांच्या मुलांना दर्जेदार उच्च शिक्षण मिळावे, हा यामागील मुख्य उद्देश होता.
संस्थेचा विस्तार:
सुरवातीला केवळ कला आणि वाणिज्य शाखेपासून सुरू झालेल्या या कॉलेजमध्ये आता कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण दिले जाते.
इतर संस्था:
त्यांच्याच नावाने Baburaoji Tidke Polytechnic Mouda in Mauda,Nagpur आणि Late Madahavrao Tidke College Of Physical Education in Mouda Nagpur,Nagpur यांसारख्या तांत्रिक आणि शारीरिक शिक्षण देणाऱ्या संस्थाही मौदा येथे सुरू झाल्या.
विदर्भात सहकार रुजविणे: त्यांनी विदर्भ प्रांतात सहकार चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
त्यांनी नागपूर जिल्ह्यातील मौदा (Mouda) सारख्या ग्रामीण तहसील भागात शैक्षणिक व सहकार संस्थांचे जाळे विणले.
सहकारी चळवळीचा पाया:
नागपूर आणि विदर्भ भागात सहकारी सुतगिरण्यांची स्थापना आणि प्रगती करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ग्रामीण भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती व्हावी, हा त्यांच्या कार्याचा मुख्य उद्देश होता.
शेतकऱ्यांचे सक्षमीकरण:
सुतगिरण्यांच्या माध्यमातून त्यांनी कापूस उत्पादकांना थेट बाजारपेठेशी जोडले आणि सहकाराच्या तत्त्वांवर आधारित उद्योगांची उभारणी केली.
शोकसंवेदना
अनेकांना प्रेरणा देणारे एक उमदे नेत्रृत्व गमावले -देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात बाबूरावजी तिडके यांनी उत्तम काम करून अनेकांना प्रेरणा दिली, त्यांच्या निधनाने एक उमदे व्यक्तिमत्व आपल्यातून हरवले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करत बाबूराव तिडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.– देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
सक्षम पिढ्या घडवणारा एक सुह्रदयी मित्र मी गमावला – अनिल देशमुख (माजी गृहमंत्री)
माझे घनिष्ट मित्र बाबुरावजी तिडके यांचे निधन खूपच वेदनादायी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! विदर्भात सहकार रुजवण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. ग्रामीण भागातील विशेषतः मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते सातत्याने कार्यरत राहिले. श्रीराम ग्रामविकास शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गोरगरिब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानाचा मार्ग प्रशस्त करत सक्षम पिढ्या घडविण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या निधनामुळे एक सुहृदय मित्र मी गमावला आहे. त्यांची उणीव कायम जाणवेल.
बाबुरावजी यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना.-अनिल देशमुख (माजी गृहमंत्री – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
बाबुरावजी तिडके यांच्या निधनाने सार्वजनिक जीवनातील मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
सहकार, शिक्षण आणि समाजकारण या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आपल्या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाने सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ नेते बाबुरावजी तिडके यांच्या निधनाने सार्वजनिक जीवनातील एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
बाबुरावजी तिडके यांनी विदर्भातील सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याचबरोबर ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली असून समाजसेवेचा त्यांचा आदर्श पुढील पिढ्यांसाठी कायम मार्गदर्शक राहील.
या दुःखद प्रसंगी बाबुरावजी तिडके यांचे पुत्र तथा मौदा नगराध्यक्ष प्रसन्ना तिडके आणि तिडके परिवाराच्या दुःखात सहभागी आहे अशा शब्दात दिवंगत बाबुराव तिडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली.-चंद्रशेखर बावनकुळे (महसूलमंत्री तथा पालकमंत्री नागपुर)
विदर्भातील राजकीय, सामाजिक शिक्षण व सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ काँग्रेस नेते आदरणीय बाबूरावजी तिडके यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे.-ॲड. आशिष जयस्वाल (राज्यमंत्री)
सार्वजनिक जीवनात त्यांनी प्रामाणिकपणे केलेले कार्य, असंख्य कार्यकर्त्यांना दिलेले मार्गदर्शन आणि समाजहिताची जपलेली भूमिका सदैव स्मरणात राहील. त्यांच्या विचारांनी व कार्याने अनेकांना प्रेरणा दिली आणि विदर्भाच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रावर कायमस्वरूपी ठसा उमटवला.
त्यांच्या निधनाने सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.
भावपूर्ण श्रद्धांजली!
ॐ शांती.
-ॲड. आशिष जयस्वाल (राज्यमंत्री)












